घरमहाराष्ट्रपु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम

पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम

Subscribe

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वा. सावरकर नाट्यगृहात सांगीतिक कार्यक्रम आणि दीपोत्सव तसेच ‘या सम हा’ हा पुलंवरील लघुपट दाखवण्यात येणार आहे

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला उद्या (दि. ८ नोव्हेंबर) सुरवात होणार आहे. रत्नागिरीच्या आर्ट सर्कल संस्थेने स्वा. सावरकर नाट्यगृहात सांगीतिक कार्यक्रम आणि दीपोत्सव तसेच ‘या सम हा’ हा पुलंवरील लघुपट दाखवण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.

रत्नागिरीत आयोजित करण्यात येणार कार्यक्रम

उद्या दिवाळी पाडवा असून्नीच्या प्रेमाचा हा सण आहे. पुल आणि सुनीताबाई यासुद्धा आयुष्यभर साहित्यातून समाजसेवा करत राहिले. त्यांनी अनेकांना मदत दिली, पण त्याची वाच्यता कोठेही केली नाही. रत्नागिरी हे सुनीताबाईंचे माहेर असल्याने आर्ट सर्कल आणि रत्नागिरीकरांना त्याचे विशेष कौतुक आहे. दहा वर्षे पुण्यातील आशय सांस्कृतिक संस्थेच्या मदतीने होणाऱ्या पुलोत्सवात दोन पुरस्कार दिले जातात. परंतु आर्ट सर्कलने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. हा सन्मान पुल आणि सुनीताबाईंच्या दातृत्वाचे अनुकरण म्हणूनच दिला जातो. गेल्या काही वर्षांत ज्या संस्थांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ओवाळणी’ द्यावी, असे आवाहन आर्ट सर्कलने केले आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात उद्या सायंकाळी ७ वाजता गीतांची मैफल सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर, गायिका आदिती करंबेळकर, तबलावादक गिरीधर कुलकर्णी आणि संवादिनी वादक हर्षल काटदरे रंगवणार आहेत. त्यानंतर सुधीर मोघे दिग्दर्शित ‘या सम हा’ हा लघुपट रसिकांना दाखवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -