घरमहाराष्ट्रबोराटे आणि कोकडेला २४ जूनला फाशी

बोराटे आणि कोकडेला २४ जूनला फाशी

Subscribe

२००७ मधील बीपीओ महिला कर्मचार्‍यावर बलात्कार आणि हत्याप्रकरण

पुण्यात २००७ मध्ये एका महिला बीपीओ कर्मचार्‍यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्या प्रकरणातील दोघा दोषींना २४ जूनला फाशी देण्यात येणार आहे. याबाबतचे वॉरण्ट नुकतेच बजावण्यात आले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन वर्षांपूर्वी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला होता.

या आरोपींची नावे पुरुषोत्तम बोराटे (३६) आणि प्रदीप कोकडे (३१) अशी आहेत. पुण्याच्या जिल्हा आणि सत्र सत्र न्यायालयाने १० एप्रिल रोजी वॉरण्ट जारी केले. सर्वोच्च न्यायालयाने ८ मे २०१५ रोजी या दोघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. सध्या हे दोघे पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. बोराटे याच्या नावावर वॉरण्ट जारी करण्यात आले असून येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य अधिकार्‍याला फाशीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. प्रदीप कोकडे याच्यावरही अशाच प्रकारचे वॉरण्ट बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

पीडित महिला मूळची गोरखपूरची होती. नोकरीच्या अखेरच्या दिवशी बोराडे आणि कोकटे यांनी तिला तिच्या घरातून कार्यालयात नेण्यासाठी कंपनीच्या गाडीत बसविले. मात्र दुसर्‍या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. तिचा मृतदेह पोलिसांना २ नोव्हेंबर २००७ रोजी गहुंजे येथे आढळला होता. या प्रकरणी बोराडे आणि कोकडे यांना अटक केली होती.

मार्च २०१२ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले आणि फाशीची शिक्षा ठोठावली. मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दोषींचा दयेचा अर्ज फेटाळला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांची फाशी कायम ठेवली होती.मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी ३० जुलै २०१५ रोजी याकूब मेमनला फाशी दिली होती. त्यानंतर राज्यात या दोघांना फाशी देण्यात येणार आह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -