घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात आठ दिवसाआड पाणी

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात आठ दिवसाआड पाणी

Subscribe

अमरावतीतील तिवसा तालुक्यातील 4 गावे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतली आहेत. मात्र, तिवसा तालुक्यातील दत्तक शेंदोळा बूजरूक येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.

अमरावती जिल्ह्यातील 12 गावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामविकास परिवर्तन योजने अंतर्गत दत्तक घेण्यात आली. यात अमरावतीतील तिवसा तालुक्यातील 4 गावे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतली आहेत. मात्र, तिवसा तालुक्यातील दत्तक शेंदोळा बूजरूक येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असून येथे आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरूक हे गाव मुख्यमंत्री दत्तक गाव योजनेत असून ३०००हजार लोकसंख्याचे गाव आहे.  मात्र यंदा मार्च महिन्यातच पाण्याची पातळी कमी झाली असल्याने गावातील ग्रामपंचायतच्या ३ बोर, ७ हातपंप, ७सार्वजनिक विहीरी व गावाला नेहमीच पाणी असणारा तलाव पूर्णपणे आटला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

- Advertisement -

एका गुंज भर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. ज्या हातपंपाला पाणी आहे तेथे सकाळ पासूनच पाणी भरण्याकरिता महिलांची मोठी गर्दी होते. गावात जनावरांच्या पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्या ठिकाणी महिला कपडे धुतात लहानमहिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन घोटभर पाण्यासाठी कोसभर पायपीट करत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -