घरमहाराष्ट्रया जन्मात केलेली पापं इथंच फेडावी लागतात - उदयनराजे

या जन्मात केलेली पापं इथंच फेडावी लागतात – उदयनराजे

Subscribe

धनगर समाजाच्या आरक्षणावर उदयनराजे यांनी दिले स्पष्ट मत. उदयनराजे म्हणाले की, 'धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. परंतु, आरक्षण दिले तर सर्वांना द्या, अन्यथा कोणालाही आरक्षण देऊ नका'.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील हजेरी लावली. या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, यावर नेतेमंडळींचे मंथन झाले. परंतु, या बैठकीत उदयनराजे यांनी केलेल्या भाषणावर जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या भाषणामध्ये बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘या जन्मात केलेली पापं इथंच फेडावी लागतात आणि म्हणून कॅन्सर, डायलेसीस सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं’. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा नक्की कुणाला टोला लगावला गेला आहे, यावर अंदाज लावले जात आहेत.

काय म्हणाले उदयनराजे?

उदयनराजे यांनी या बैठकीत आपले आरक्षण संबंधित स्पष्ट मत व्यक्त केले आहे. उदयनराजे यांनी मंडल आयोगवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘मंडल आयोगामुळे सगळी वाट लागली आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिले गेले पाहिजे’. त्याचबरोबर धनगर आरक्षणावर बोलताना उदयन राजे म्हणाले की, ‘धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु, दिलं तर सगळ्यांना द्या. अन्यथा कोणालाच आरक्षण देऊ नका’. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी धनगर समाज लढत आहे. आरक्षण मिळावे यासाठी धनगर आणि मराठा समाजाने आंदोलनेही केली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा  उदयनराजे खालच्या पातळीवर उतरतील, असे वाटले नव्हते – शिवेंद्रराजे

मंडल आयोग म्हणजे काय?

मागसवर्गीय समाजाच्या हितरक्षणार्थ १९७८ साली बि. पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. भारतीय संविधानाच्या ३४० व्या कलमानुसार अनुसूचित जाती आणि जमाती व्यतीरिक्त सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास जाती या देशात सहवास करतात. या जातींचा शोध घेऊन त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध सवलती देण्यात यावे, असे त्यात नमूद करण्यात आले होते. परंतू, हा मागासवर्ग समाज कोण? याचा शोध घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना झाली, तो आयोग म्हणजे मंडल आयोग.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीत दुर्लक्षित उदयनराजेंना भाजपात घेण्यासाठी नेते उतावीळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -