घरमहाराष्ट्रउल्हासनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत बेशिस्तपणा

उल्हासनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत बेशिस्तपणा

Subscribe

महापौरांनी दिली समज

उल्हासनगर मनपाची बुधवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना काही नगरसेवक हे आपसात गप्पा मारताना दिसले. काही नगरसेवक महापौरांची परवानगी न घेता बोलतात, काही जण विषयाशी निगडित नसलेल्या बाबींवर चर्चा करतात अशा नगरसेवकांना अनेक वेळा महापौर पंचम कलानी यांनी हा प्रकार थांबवावा, अशी वारंवार विनंती केली. मात्र तरी देखील हा प्रकार सुरू असल्याने महापौरांनी त्यांना चांगलीच समज दिली.

मनपाच्या सभागृहात काही नगरसेवकांचा बेशिस्तपणा वारंवार प्रत्ययास येतो. सभागृहात उल्हासनगर शहरात बेघर झालेले रहिवासी आणि त्यांचे पुनर्वसन या गंभीर मुद्यांवर चर्चा सुरू असताना काही नगरसेवक घोळका बनवून विषयपत्रिकेवर नसलेल्या विषयाबद्दल चर्चा करीत होते.हा गोंधळ सुरू असताना शिवसेना नगरसेविका जोत्सना जाधव यांनी शहरातील शौचालयांची दुरावस्थाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र चर्चा सुरू असताना उपायुक्त संतोष देहरकर हे उपमहापौर जीवन ईदनानी यांच्याशी चर्चा करीत होते. त्यामुळे आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत माझ्या बोलण्याकडे आयुक्त लक्ष देत नाहीत मी काय शूद्र आहे काय? असे वादग्रस्त विधान केले.

- Advertisement -

भाजप नगरसेवक जमनू पुरुसवानी हे सभागृहात बोलत असताना शिवसेना नगरसेवक सुरेंद्र सावंत यांनी त्यांना मध्येच थांबवून अरेरावी आणि उर्मटपणे बोलल्याने शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण झाले. भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी मनपा प्रशासन कोणत्याच प्रकारचे काम करीत नसल्याने आम्ही लोकांसमोर तोंडघशी पडलो आहोत असे सांगून आम्ही नगरसेवक राजीनामा देऊ अशी धमकी दिली. यावर भाजपचेच नगरसेवक डॉ. प्रकाश नाथानी यांनी आक्षेप घेत आम्ही कशाला राजीनामा देऊ? असा प्रतिप्रश्न रामचंदानी यांना केला. यामुळे भाजप नगरसेवक आपसातच भिडले. हा सर्व प्रकार बघून महापौर पंचम कलानी यांनी प्रथम नगरसेवकांना विनंती केली नंतर नगरसेवकांनी सभागृहाची मानमर्यादा राखावी,बेशिस्तपणा करू नये यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशी समज दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -