नवी मुंबईत घराजवळ भाजीपाला उपलब्ध होणार

Mumbai

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याकाळात जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन संपूर्णपणे खबरदारी घेत आहे. करोना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी भाजी मंडईमध्ये गर्दी करू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आह

मात्र, कृषीशी संबधित बियाणे, खते, काढणी प्रक्रिया, वाहतूक यासाठी बंदी नाही. शेतमाल वाहतुकीत अडथळा येवू नये, यासाठी राज्याच्या सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑनलाईन परवानगी दिली जाईल. वाहतुकदारांनी कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर १० मिनिटांत ही परवानगी मिळेल. त्यासाठी कार्यालयाकडून एक स्टिकर उपलब्ध करून दिले जाईल. हे स्टिकर वाहनांच्या अग्रभागी लावावे. देशपातळीवर जरी शेतमाल वाहतूक करायची असेल तरी कुठलीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काही ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी मोठया प्रमाणावर झुंबड उडताना दिसते आहे. यासाठी नियोजन सुरू आहे. साधारणपणे त्या-त्या भागातील कॉलनी, बाजारपेठेत जी किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते आहेत, त्यांच्याशी समन्वय साधून त्यांची मागणी नोंदवून घेत त्यांना जागेवरच माल देण्याबाबत नियोजन केले जाते आहे.

त्याचप्रमाणे बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतकर्यांच्या मदतीने एकत्रित पॅकेज देण्यात येवून नागरिकांना घरीच किंवा सोसायटीपर्यंत भाजीपाला उपलब्ध करून देता येईल का, याचाही विचार सुरू असल्याचे भुसे यांनी सांगितले. भाजीबाजारात होणारी गर्दी लक्षात घेता विविध भागांमध्ये भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्याचेही नियोजन केले जाते आहे. आपल्याकडे अन्नधान्य, भाजीपाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून जावू नये.

कंटेनर उपलब्ध करून देणार
द्राक्ष काढणी सध्या सुरू आहे. मात्र, खरेदीसाठी व्यापारी पुढे येत नाही तसेच, कंटेनरही उपलब्ध होत नसल्याबाबत द्राक्ष बागायतदार संघाच्या अडचणी आहेत. यासंदर्भात द्राक्ष उत्पादकांशी चर्चा करण्यात आली आहे. द्राक्ष वाहतुकीसाठी कंटेनर हे मुंबईतून येतात याकरीता तेथील प्रशासनाशी चर्चा करण्यात आली असून लवकरच कंटेनर उपलब्ध करून दिले जातील. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here