Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कॉंग्रेस जेष्ठ नेते विलासराव उंडाळकर यांचे निधन

कॉंग्रेस जेष्ठ नेते विलासराव उंडाळकर यांचे निधन

Related Story

- Advertisement -

सलग सातवेळा कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आणि ३५ वर्षे आमदार राहिलेले कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव उंडाळकर (८५) यांचे आज पहाटे सातारा येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. साताऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान त्यांची प्राणजोत मालवली. आज सोमवारी दुपारी कऱ्हाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

विलासवार उंडाळकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात १९६७ साली केली. त्याआधी ते १९६२ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालक म्हणून काम करत होते. तब्बल ३५ वर्षे ते आमदार राहिले. सहकार, विधी व न्याय, माजी सैनिक कल्याण, दुग्ध विकास मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सलग सात वेळा त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. सतत माणसांमध्ये राहणारा नेता आणि सच्चा कॉंग्रेसी अशी त्यांची जनमाणसात प्रतिमा होती. कराड दक्षिण मतदारसंघ कॉंग्रेसचा अभेद्य किल्ला म्हणून त्यांनी अविरतपणे पक्षासाठी काम केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतचे असलेले मतभेद आणि वैरत्व संपवत एकत्र काम करण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर मात्र गेल्या काही दिवसांपासून खालावत गेलेल्या तब्येतीमुळे त्यांच्यावर साताऱ्यात खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

- Advertisement -

काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपला – अशोक चव्हाण

- Advertisement -

राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार उराशी बाळगून लोकसेवा केली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली तत्त्व आणि मूल्ये कायम ठेवली. ते सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले एक लोकप्रिय नेते होते. सलग ३५ वर्षे आमदार म्हणून सातारा जिल्ह्यासाठी आणि सहकारमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.


 

 

- Advertisement -