घरमहाराष्ट्र'मुळशी पॅटर्न' पाहताना गुंडाला अटक

‘मुळशी पॅटर्न’ पाहताना गुंडाला अटक

Subscribe

उमेश कोल्हापूरच्या हर्षवर्धन ठाकूर देसाई यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. ठाकूर देसाई यांची सहा जणांनी मिळून हत्या केली होती. त्यामधील उमेश हा तिसरा मुख्य आरोपी आहे.

‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट पाहताना पोलिसांनी एका गुंडाला अटक केली आहे. विशेष म्हणजे मुळशी पॅटर्न हा चित्रपट गुन्हेगारी विश्वावरच आधारीत आहे. हा चित्रपट पुण्याच्या मंगला थिएटरमध्ये कोल्हापूरचा कुख्यात गुंड पाहत होता. कोल्हापूर पोलीस गेल्या काही दिवसापासून या आरोपीच्या शोधात होते. अखेर त्याला चित्रपट पाहत असताना पोलिसांनी अटक केली. रात्री साडे अकरा वाजता चित्रपट सुरु असताना पोलिसांनी थिएटरमध्ये धाव घेतली. चित्रपट थांबवून लाईट सुरु करुन त्यांनी या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. उमेश अरबाळे असं या आरोपीचे नाव आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उमेळ अरबाळे हत्या, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. या गुन्ह्याचा तपा कोल्हापूर पोलिसांकडून सुरु होता. त्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. शेवट शनिवारी रात्री कोलहापूर पोलिसांना उमेश पुण्यात असल्याची माहिती मिळाली. कोल्हापूर पोलिसांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलिसांना सांगितले. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी उमेशला बेड्या ठोकल्या. उमेश हा मुळचा कोल्हापूरच्या इंचलकरंजीचा रहिवासी आहे.

- Advertisement -

ठाकूर देसाई हत्याप्रकरणातील आरोपी

उमेश कोल्हापूरच्या हर्षवर्धन ठाकूर देसाई यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. ठाकूर देसाई यांची सहा जणांनी मिळून हत्या केली होती. त्यामधील उमेश हा तिसरा मुख्य आरोपी आहे. या हत्येच्या घटनेनंतर उमेश पुण्यात लपून बसला होता पोलीस त्याचा शोध घेत होते. शेवटी कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या.

हेही वाचा –

- Advertisement -

अँकर मृत्यू प्रकरण: को-अँकर राहुल अवस्थीला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -