घरमहाराष्ट्रसाहित्य संमेलनात दिसल्या नयनतारा

साहित्य संमेलनात दिसल्या नयनतारा

Subscribe

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण आयोजकांनी रद्द केले होते. तरीदेखील नयनतारा सहगल या संमेलनामध्ये झळकताना दिसल्या आहेत.

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रण दिले होते. परंतु, राजकीय दबावामुळे त्यांचे आमंत्रण आयोजकांनी रद्द केले. तरीदेखील नयनतारा आजच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये दिसल्या. आमंत्रण नाकारले असतानाही नयनतारा संमेलनामध्ये दिसल्या आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

हेही वाचा – साहित्य संमेलनाच्या वादात सरकारला गोवू नका

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द केल्यामुळे रत्नागिरीच्या काही महिलांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनवेळी साहित्य मंडळाचा आणि आयोजकांचा निषेध केला. हा निषेध त्यांनी सहगल यांच्या चेहऱ्याचा मुखवटा घालून व्यक्त केला. त्यामुळे सहगल यांचा मुखवटा हा चर्चेच विषय ठरला. सहगल यांचे हे मुखवटे काय साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. रत्नागिरीच्या या महिला उद्घाटनवेळी प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या. त्यांनी नयनतारांचे मुखवटे घातले होते. त्यांनी नयनतारा यांच्या भाषणाच्या प्रतीदेखील आणल्या होत्या.

हेही वाचा – नयनतारा सहगल प्रकरण : साहित्यिकांचा निमंत्रण वापसीचा सूर

- Advertisement -

मुखवटे आणि भाषणाच्या प्रती जप्त

या संमेलनाला नयनतारांचे आमंत्रण रद्द केल्यामुळे त्यांचे भाषणही वाचले जाणार नाही. तरीही या महिला नयनतारा यांच्या भाषणाच्या प्रती घेऊन आल्या होत्या. या महिला भाषणाच्या प्रती लोकांना वाटणार होत्या. दरम्यान, नयनतारांच्या भाषणाच्या प्रती आणि मुखवटे आयोजक आणि पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते उद्घाटन

नयनतारा यांचे आमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाचा उद्घाटक कोण होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, काही नामांकित साहित्यिकांनी नयनतारा यांचे आमंत्रण रद्द केल्यामुळे संमेलनावर बहिष्कार टाकला. शुक्रवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -