वर्क फ्रॉम होममुळे घरगुती विजेचा वापर वाढला

Mumbai
nitin raut
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती

लॉकडाऊनमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वीज बिल वाढले, अशी माहिती देताना संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेमुळे शॉक बसलेल्या वीज ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

यावेळी स्पष्टीकरण देताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागरिक घरातच असल्याने विजेचा वापर वाढला. वर्क फ्रॉम होममुळे बिल वाढले. वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करू. घरगुती वीज बिल भरण्यासाठी तीन आठवड्यांची मुभा देण्यात आली आहे. वाढीव वीज बिलांची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने https://billcal. mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक दिलेली आहे. तुम्ही महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीज बिलांची आकारणी समजून घेऊ शकता, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीज बिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल. काही ठिकाणी चुका घडल्याही असतील, पण ते प्रमाण अल्प आहे आणि त्यात सुधारणा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

जून २०२० चे बिल तीन आठवड्यांमध्ये भरण्याची घरगुती ग्राहकांना मुदत देण्यात आली आहे. एकूण बिलाची कमीत कमी एक तृतीयांश रक्कम भरल्यास तुमचे मीटर कनेक्शन कापले जाणार नाही. शिवाय, तुम्ही संपूर्ण बिल भरले तर दोन टक्क्यांची सूट दिली जाणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. जर तुम्ही याआधीच संपूर्ण बिल भरले असेल तर त्यांनाही हा लाभ मिळणार आहे. यासह, जे लॉकडाऊनमध्ये घरी गेले होते आणि वीजवापर एकदमच कमी असतानासुद्धा त्यांना रिडिंग घेता न आल्यामुळे सरासरी बिल आले असेल, त्यांची बिले दुरुस्ती करून देण्यात येतील, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.

या सर्व उपाययोजनांचा वापर करूनसुद्धा जर लोकांचे समाधान झाले नाही तर ग्राहक मला स्वतःहून संपर्क करू शकतात, असे सांगत नितीन राऊतांनी स्वतःचा ईमेल आयडी आणि फोन नंबर दिला. [email protected] in+91-9833717777 | +91 9833567777

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here