घरCORONA UPDATEधारावीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

Subscribe

शुक्रवारचा दिवस ‘शून्य कोरोना दिवस’ ठरला

काही महिन्यांपूर्वी करोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या धारावीसाठी शुक्रवारचा दिवस ‘शून्य कोरोना दिवस’ ठरला आहे. धारावीत शुक्रवारी करोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही.

मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर २० दिवसांनी १ एप्रिल रोजी धारावीत कोरोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर धारावी झोपडपट्टीत वेगाने कोरोनाची साथ फैलावली होती. धारावीत आतापर्यंत ३ हजार ४६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता फक्त १२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत व त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. धारावी लगतच्या माहीम आणि दादर भागातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -