खेळताना ओढणीने गळफास लागला

11 वर्षीय मुलाचा मृत्यू

Mumbai
Objecting To smoke, co - passenger attacked on pregnant woman
प्रातिनिधिक फोटो

सुट्टीमध्ये आईकडे आलेल्या ११ वर्षाच्या मुलाचा ओढणीसोबत खेळत असताना ओढणीचा फास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी काळाचौकी येथे घडली. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

साजिद शेख असे या मुलाचे नाव आहे. काळाचौकी येथील ग.द.आंबेरकर मार्ग, परशुराम नगर या ठिकाणी साजिद हा आई आणि मोठ्या भावासोबत राहत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर साजिदला आईने पश्चिम बंगाल येथे गावी शिक्षणासाठी पाठवले होते. दिवाळीच्या सुट्टीत साजिद मुंबईत आईकडे आला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आई घरकाम करण्यास गेली असता साजिद घरात एकटाच होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आई घरी आली असता साजिद हा घरातील लोखंडी शिडीला बांधलेल्या ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला.आईने शेजार्‍यांना बोलावून त्यांच्या मदतीने त्याच्या गळाभोवती गुंडाळलेली ओढणी काढून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

साजिद हा घरात ओढणीने खेळत असताना त्याचा गळा ओढणीत अडकून फास लागून त्याचा मृत्यू झाला असल्याचे काळाचौकी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here