घरमुंबईसोसाट्याच्या वार्‍यामुळे २० झाडे कोसळली

सोसाट्याच्या वार्‍यामुळे २० झाडे कोसळली

Subscribe

पूर्वेतील एमआयडीसी निवासी भागात गुरुवारी रात्री आलेल्या जोरदार पाऊस व वादळाने मोठ्या प्रमाणांत नागरिकांचा मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे एमआयडीसी मिलापनगर परिसरात तब्बल २० झाडे कोसळली आहेत. यामध्ये दोन कारचे, घरांच्या शेडचे नुकसान झाले आहे. प्रदीप राजे हे रहिवाशी सुदैवाने बचावले आहेत. मिलापनगरमधील ग्रीन्स इंग्लिश स्कुलचे वादळी वार्‍यामुळे बरेच नुकसान झाले आहे. शाळेच्या बसचा काचा फुटल्या असून गच्चीवरील पत्रे तुटून पडले आहेत. शुक्रवारी महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने झाडे हटविण्यात आली आहेत.

मिलापनगर तलाव रोडवर उभ्या असलेल्या नॅनो कारवर तर सुदर्शन नगरमधील साईसृष्टी सोसायटी समोर उभी असलेल्या स्वीफ्ट डिझायर गाडीवर झाड कोसळल्याने दोन्ही गाडयांचे नुकसान झाले आहे. मिलापनगर सर्व्हिस रोडवरील कृष्णाई बंगल्यावर झाड पडल्याने बंगल्यावरील पत्र्यांचे नुकसान झाले. मात्र यावेळी झाडाखाली असणारे काही रहिवाशी सुदैवाने बचावले.

- Advertisement -

सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाटामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अतिवृष्टी ही नैसर्गिक घटना असल्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नागरिकांना मदत द्यावी, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. पावसाळ्यात जेवढी झाडे पडली नव्हती, तेवढी गुरुवारी रात्री कोसळली. पर्यावरणाचा र्‍हास झाला असून, झाडे मोठ्या प्रमाणात का कोसळत आहेत याचा विचार करणे जरूर आहे.

प्रोबेस स्फोट मालमत्ता नुकसान भरपाई देण्यास शासनाने नकार दिला त्याचे कारण मानव निर्मित/नैसर्गिक घटना नसल्याचे शासनाचा महसूल (मदत व पुनर्वसन) यांनी माहीती अधिकारात कळविले होते. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे करण्याार असल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.

- Advertisement -

कुठे पडली झाडे ..

सुदर्शन नगर-सिस्टरनिवोदिता गल्लीत -०३ झाडे
ग्रीन स्कुलगल्लीमागे –०२ झाडे
राजन मराठे यांचे बंगल्या बाजुला शेडवर- ०१ झाडे
सेंट जेसोफ स्कुल गल्ली -०१ झाडे
सव्हिॅस रोड————०२ झाडे
तलाव रोड—–०१ झाडे
पेंढारकर कॉलेज-, उस्मा पेट्रोल पंप रोडला—०८ ते १० झाडे
बदाम गल्लीला—०३ झाडे(रस्ता बंद झाला)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -