मुंबईत एका रात्रीत तीन ठिकाणी आग

बुधवारी रात्री तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने या तीन ठिकाणी लागलेल्या आगींमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

Mumbai
fire breaks out at a clothing shop in dadar
दादरमध्ये कापडाच्या दुकानाला आग

मुंबई येथे बुधवारी रात्री तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने या तीन ठिकाणी लागलेल्या आगींमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांताक्रुझः मिलन सब-वे गोदामाला भीषण आग

बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सांताक्रुझ येथील मिलन सब-वे येथील एका गोदामाला भीषण आग लागल्याने तीन गोदामं जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीची माहिती मिळताच १० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या. या १० गाड्यांच्या मदतीने ही आग अवघ्या दहा मिनिटातच अटोक्यात आणण्यात आली.

वडाळाः गणेशनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग

याच दिवशी रात्री वडाळ्यातील गणेशनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत सहा जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आग्रीपाडाः इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग

एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग्रीपाडा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली. वेळेवर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग विझवण्यास मदत झाली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.


बॅगने रोखला हार्बर रेल्वे प्रवाशांचा मार्ग