घरमुंबईनिवडणुकीच्या रिंगणात ४१८ अपक्ष उमेदवार

निवडणुकीच्या रिंगणात ४१८ अपक्ष उमेदवार

Subscribe

२०१४ मध्ये अपक्षांनी १५ लाख मते घेतलेली

कधी कुणाला तिकीट नाही म्हणून तर कधी निवडणूक लढण्याची इच्छा म्हणून तर कधी दुसर्‍याचे मतदान कमी करण्यासाठी काहीजण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीत राज्यभरातून ४८ लोकसभा मतदारसंघात सुमारे ४१८ जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर सर्व मिळून एकूण ८६७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ४४४ अपक्ष उमेदवारांनी 15,77,114 मते मिळवली होती.

बीडमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार असून, इथे २६ जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे गडचिरोली-चिमुर मतदारसंघात मात्र एकही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. दरम्यान नागपूर- १३, यवतमाळ वासिम – १४, रामटेक ६, भंडारा-गोंदिया ८, चंद्रपूर ४, बुलढाणा ७, अकोला ५, अमरावती १५, हिंगोली १७, नांदेड ७, परभणी ४, उस्मानाबाद ७, लातूर ३ आणि सोलापूरमध्ये ६ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

- Advertisement -

२००९ पेक्षा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना मतदारांनी कमी पसंती दर्शवली होती. २००९ मध्ये ४१० अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी या अपक्ष उमेदवारांना 29 लाख 83 हजार 128 इतकी मते मिळाली होती. मात्र २०१४ ला ४४४ अपक्ष उमेदवारांना फक्त १५ लाख ७७ हजार ११४ मते मिळाली होती. त्यामुळे जर ही आकडेवारी पाहिली तर २०१४ मध्ये २००९ च्या तुलनेत अपक्ष उमेदवारांना मिळणार्‍या मतांमध्ये ४.७९ इतकी घट झाली होती. यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचे काय होणार हे पहावे लागेल.

2019 मधील अपक्ष उमेदवार

- Advertisement -

टप्पा अपक्ष उमेदवारांची संख्या

पहिला टप्पा 51 116
दुसरा टप्पा 97 179
तिसरा टप्पा 126 249
चौथा टप्पा 144 323

मागील निवडणुकीची आकडेवारी
वर्ष अपक्ष उमेदवार मतदान टक्केवारी विजयी अपक्ष उमेदवार
2009 410 29,83,128 8.06 1
2014 444 15,77,114 3.27 0

म्हणून अपक्ष म्हणून लढतात निवडणूक
अपक्ष म्हणून का निवडणूक लढवली जाते याची अधिक माहिती घेतली असता, काही जण हे जिंकण्यासाठी तर काही जण दुसर्‍या उमेदवारांची मते फिरवण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढतात. काही तिकीट न दिल्याच्या नाराजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात. यंदाही भाजपचे आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -