Corona: मुंबईत ७५० बाधित क्षेत्रे, ५ हजार ८७५ इमारती सील

उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईच्या पट्टयांमध्ये कोरोनाच्या आजाराचा फैलाव कायम

Mumbai
प्रातिनिधीक फोटो

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे सांगितले जात आहे, असे तरी उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईच्या पट्टयांमध्ये कोरोनाच्या आजाराचा फैलाव अधिकच होत आहे. तरीही या संपूर्ण मुंबईत एकूण ७५० बाधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. तर मुंबईत आतापर्यंत एकूण ५ हजार ८७५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

या विभागात एकूण ९६ बाधित क्षेत्रं

मुंबईतील २४ विभागांमधील बाधित क्षेत्र आणि सील केलेल्या इमारतींची सुधारीत यादी महापालिकेने प्रदर्शित केली आहे. त्यानुसार एकूण ७५० कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले आहे. तर यासर्व कंटेन्ममेंट झोनमधून एकूण २५ हजार ९३१ कोरेाना बाधित रुग्ण आढळून आले आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसर, सोसायटी परिसर, चाळींचा परिसर आदी भाग कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले आहे. या ७५० बाधित क्षेत्रांमध्ये १० लाख ८८ हजार सदनिकांचा समावेश आहे. तर एकूण लोकसंख्या ४७ लाख १३ हजार ७७९ एवढी आहे.

सर्वात जास्त बाधित क्षेत्र ही कुर्ला एल विभागात असून या विभागात एकूण ९६ बाधित क्षेत्र आहेत. त्याखालोखाल गोवंडी, मानखुर्द, देवनार या एम-पूर्व विभाग व भांडुप-कांजूरमार्ग-विक्रोळी या एस विभागात प्रत्येकी ७४ बाधित क्षेत्र आहेत. तर कांदिवली आर-दक्षिण व दहिसर आर-उत्तर या दोन विभागांमध्ये अनुक्रमे ४३ व ४२ एवढी बाधित क्षेत्र आहेत.

मुंबईत एकूण ५ हजार ८७५ इमारती सील

मुंबईत एकूण ५ हजार ८७५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. या सील करण्यात आलेल्या इमारतींमधून आतापर्यंत १६ हजार २१७ रुग्ण आढळून आले आहेत. सील करण्यात आलेल्या इमारती व चाळींमध्ये ३ लाख ५२ हजार ८१५ सदनिकांचा समावेश आहे. इमारत सील करताना संपूर्ण इमारतीऐवजी बाधित रुग्ण राहत असलेला मजलाच सील करण्यात येतो. तर एसआरएच्या इमारतींना पूर्णपणे सील करण्यात येत आहे. त्यामुळे यासर्व सील केलेल्या इमारतींच्या परिसरांमध्ये एकूण लोकसंख्या ही १४ लाख ३१ हजार ५१२ एवढी आहे.

  • बाधित क्षेत्र : ७५० (आढळून आलेले रुग्ण : २५ हजार ९३१)
  • सील केलेल्या इमारती : ५८७५ (आढळून आलेले रुग्ण : १६ हजार २१७)

देशात २४ तासांत १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here