घरमुंबईजन आशीर्वाद यात्रेतून युवा सेना मतदारांना साद घालणार!

जन आशीर्वाद यात्रेतून युवा सेना मतदारांना साद घालणार!

Subscribe

आदित्य ठाकरेंनी त्यांच्या बहुचर्चित जन आशीर्वाद यात्रेची घोषणा केली असून मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी त्याबद्दल माहिती दिली.

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना आता शिवसेनेने कंबर कसली असून, युवा सेना देखील कामाला लागली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आता जन आशीर्वाद यात्रा काढणार असून, या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा १८ जुलै ते २२ जुलै असा असणार असल्याची माहिती युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अशी असेल ‘जन आशीर्वाद यात्रा’

आदित्य ठाकरे यांची ही जन आशीर्वाद यात्रा एकूण ६ टप्प्यांत असणार आहे. पहिला टप्पा १८ जुलैला सुरू होत असून, जळगावमध्ये आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यानंतर १९ जुलै धुळे, मालेगाव, २० जुलै नाशिक शहर, २१ जुलै नाशिक ग्रामीण, नगर आणि २२ जुलै नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी अशी ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. दरम्यान, ६ टप्प्यांमध्ये असलेल्या या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे चार हजार हून अधिक किलोमीटर प्रवास करणार आहेत. ‘लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार तर ज्यांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकणार’, असल्याचं वरूण यांनी यावेळी सांगितलं. या जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्ता, मेळावा, जाहीर सभा आणि संवाद देखील होणार असल्याची माहिती वरूण सरदेसाई यांनी दिली.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – पालिकेत महापौरांचे चालते की आदित्य ठाकरेंचे? वाहनतळाबाबत नवा निर्णय!

‘ती तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा’

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी का? या प्रश्नावर बोलताना वरूण सरदेसाई यांनी, ‘त्यांनी निवडणूक लढवावी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असून, आदित्य ठाकरे गेली १० वर्ष युवा सेनेचे नेतृत्व करत आहेत. आदित्य ठाकरे जिथे प्रचार करतात तिथे शिवसेनेचा विजय नक्की आहे’, असे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचा की भाजपाचा? यावर बोलणे टाळले. तसेच ‘मुख्यमंत्री कुणाचा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ठरलं आहे. पुढील सर्व निर्णय ते घेतील’, असंदेखील त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -