तिन्ही मार्गांवर गारेगार प्रवास

उंचीचा तिढा सुटल्याने एसी लोकल धावणार

Mumbai
AC local
एसी लोकल

मध्य रेल्वे मार्गावर येणारी पहिली एसी लोकल उंचीच्या अडचणीमुळे रूळावर येत नव्हती. त्यामुळे मरेची पहिली एसी लोकल फक्त ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येणार होती.पण, मध्य रेल्वेला लोकलची उंची ४२७० मिमी कमी करून एसी लोकल उंचीचा तिढा सोडविण्यात यश आले असून आता मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर एसी लोकल धावणार आहे. असल्यामुळे मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास अनुभवता येणार आहे.

देशातील पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ पासून धावली होती. आज सुध्दा या एसी लोकलच्या फेर्‍या वाढविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या एसी लोकलची उंची ४२८३ मिमी आहे. तर मध्य रेल्वे येणार्‍या एसी लोकलची उंची ४२७०मिमी आहे. मध्य रेल्वेची एसी लोकल ही उंचीचे लहान आहे. त्यामुळे मरेच्या तिन्ही मार्गावर ही ट्रेन चालविणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे.

ही ट्रेन आयसीएफमधून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आलेली असून तिला मध्य रेल्वेवर येण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ही लोकल भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड( भेल)कंपनीची असल्यामुळे तिच्या जास्त चाचण्या घेण्याची आवश्यकता नाही. परिणामी मध्य रेल्वेवर दाखल झाल्यानंतर ही लोकल १५ दिवसात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.येत्या २५डिसेंबरलाच मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल धावण्याची शक्यता आहे.