घरमुंबईराज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

Subscribe

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हानिकारक ठरत असून अशा पदार्थांची सर्सासपणे होणारी विक्री रोखण्यासाठी एफडीएकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात आता कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचं शिवाय सुपारीच्या उत्पादनाचं, साठवण, विक्री केल्यास त्याच्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून संपूर्ण महाराष्ट्रात २० जुलैपासून प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.

तंबाखूजन्य अनेक पदार्थांवर बंदी

महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी याबाबतचा आदेश जाहीर केला आहे की, तंबाखू आणि सुपारीच्या उत्पादन, साठवण आणि विक्रीवर २० जुलैपासून बंदी लागू करण्यात आली आहे. पुढील वर्षापर्यंत ही बंदी असणार आहे. या आदेशांतर्गत तंबाखू उत्पादनांमध्ये असलेले सुंगंधित सुपारी जसे की, गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा या पदार्थांचा समावेश केला जाणार आहे. शिवाय, वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये पॅक केलेले अनेक सुगंधी पदार्थांवर बंदी घालण्यात आली असल्याचंही डॉ. दराडे यांनी सांगितलं.

- Advertisement -

अभिनेत्यांना जाहिरात करण्यापासून रोखा

या घातक तंबाखूजन्य पदार्थांवर लावलेल्या बंदीवर टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रोफेसर डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सरकारचं कौतुक करताना सांगितलं की, “केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी चौबे यांनी गेल्या संसदेत एक प्रश्न विचारत सांगितले होते की, ”सुपारी कर्करोगाचं कारण आहे. एफएसएसएआयनुसार, प्रत्येक सुपारीच्या पॅकेटवर चेतावनी देणारा ‘सुपारी आरोग्यासाठी हानिकारक आहे’, संदेश लिहिला गेला पाहिजे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारकडून घेतला गेलेला सुगंधित सुपारी आणि पान मसालावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य आहे. पान मसाल्यासाठी क्रिकेट, फिल्म फेस्टिव्हल इत्यादी मोठ-मोठ्या कंपन्या प्रायोजक असतात. यासोबत बॉलीवूड अभिनेते सुगंधित गुटखा, पान मसाल्याची जाहिरात करतात. त्यामुळे त्यांनाही अशा जाहिराती करण्यापासून रोखले पाहिजे. ”

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ च्या अहवालानुसार, १५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील २९.६ टक्के पुरुष, १२.८ टक्के महिला आणि २१ टक्के सर्व वयातील नागरिक तंबाखूचा वापर करतात. तंबाखूचा जास्तीत जास्त वापर भारतासह जगात मृत्यू आणि आजाराचं प्रमुख कारण आहे. भारतात दरवर्षी १३.५ लाख मृत्यू होतात. 
संजय सेठ, ट्रस्टी, संबंध हेल्थ फाउंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -