बेस्ट कर्मचाऱ्यांनंतर ओला – उबर चालक जाणार संपावर

गेल्या १० दिवसामध्ये ओला आणि उबर कंपन्यांनी मिळून ५००० चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली होती. ऑक्टोबरमध्ये झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आहे.

Mumbai
Ola-Uber Taxi Drivers will Strike
ओला- उबर चालक जाणार संपावर

बेस्ट कर्मचारी संपानंतर आता ओला आणि उबर चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. आधीच बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करुन मुंबईकरांना वेठीस धरले आहे. त्यानंतर आता ओला आणि उबर चालक संपावर जाणार आहेत. दरम्यान, ओला-उबर चालक संघटनांनी ओला आणि उबर कंपन्या चालकांना जाणीवपूर्वक ब्लॅक लिस्ट करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच कंपनी ब्लॅक लिस्ट केलेल्या गाड्यांच्या जागी स्वत:ची गाडी सुर करण्याचा प्रयत्न करत असल्याने ओला आणि उबर चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घएतला आहे.

५००० चालकांवर कारवाई

ऑक्टोबरमध्ये ओला-उबेर चालक संघटनांनी जवळपास १० दिवस संप पुकारलेला होता. त्यानंतर आता पुन्हा ओला-उबेर चालक संपावर जाणार आहेत. गेल्या १० दिवसामध्ये ओला आणि उबर कंपन्यांनी मिळून ५००० चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली होती. ऑक्टोबरमध्ये झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आहे. कंपनीकडून ही जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोमवारी अधिकृत घोषणा होणार

दरम्यान, ओला- उबर चालकांच्या विविध मागण्या फक्त पुर्ण करण्याचे आश्वासन सरकार देत आहे. ऑक्टोबरमध्ये पुकारलेल्या संपावेळी सरकारने आश्वासन दिल्यानंतर ओला-उबर चालकांनी संप मागे घेतला होता. मात्र त्यावेळी सरकार आणि कंपनीने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. तर याउलट कंपनीकडून कोणतेही कारण न देता वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ओला- उबर चालकांनी पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सोमवारी या संपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

हेही वाचा – 

ओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक

‘ओला-उबर’चा संप स्थगित; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here