घरमुंबईअंबरनाथमध्ये झाडांना आग लागण्याचे सत्र सुरुच

अंबरनाथमध्ये झाडांना आग लागण्याचे सत्र सुरुच

Subscribe

अंबरनाथच्या खुंटवली डोंगरावरील झाडांना आज आग लागली. या आगीमध्ये डोंगरावरील अनेक झाडं जळून खाक झाली आहेत.

अंबरनाथमध्ये पुन्हा झाडांना आग लागल्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या खुंटवली डोंगरावरील झाडांना आज आग लागली. या आगीमध्ये डोंगरावरील अनेक झाडं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र डोंगराला आग लागल्यामुळे परिसरामध्ये धूराचे लोट पसरले आहे. गेल्या काही दिवसापासून अंबरनाथमध्ये आगी लावण्याचे सत्र सुरुच आहे. त्यानंतर आणखी एक घटना आज समोर आली आहे. डोंगरावरील झाडांना लागलेली आग कोणी आणि का लावले याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

वरप येथे मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या झाडांना काही दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर मांगरुळ येथे जुलैमध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लावलेल्या झाडांना आग लागल्याची घटना घडली होती. सरकारच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या अंतर्गत मांगरुळ गावामध्ये एक लाख झाडे लावण्यात आली होती. मंगळुरु गावाजवळ डोंगराला लागलेल्या आगीमध्ये २० हजार झाडे जळून खाक झाली होती. या झाडांना अज्ञातांनी आग लावण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे.

हेही वाचा – 

मांगरूळ रोपवन जळीत कांड

आंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -