आकाश अंबानीची लग्नपत्रिका बाप्पाच्या चरणी अर्पण!

मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांनी सोमवारी प्रभादेवी येथील सिद्धिवानयाच्या चरणी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याची लग्नपत्रिका अर्पण केली.

Mumbai
अनिल आणि नीता अंबानी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत पूत्र अनंत यांनी काल, सोमवारी प्रभादेवी येथील सिद्धिवानयाच्या चरणी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याची लग्नपत्रिका अर्पण केली. पुढील महिन्यात आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्याची पत्रिका सर्वप्रथम बाप्पाच्या पायाशी ठेऊन अनिल आणि नीता अंबानी यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. या वेळी प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार आणि गणेश भक्तांसह अंबानी परिवाराच्या चाहत्यांनी मंदिर आणि मंदिराबाहेर गर्दी केली होती.

बीकेसीत होणार लग्नसोहळा

काही दिवसांपूर्वीच आकाश आणि श्लोका यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली होती. पुढील महिन्यातील ९ तारखेला आकाश आणि श्लोकाचा विवाह होणार असून त्यानंतर १० मार्च रोजी वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. तर ११ मार्चला या दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा जियो सेंटरमध्ये होणार आहे. मुकेश अंबानी यांची सोयरीक हिरे व्यापारी रसेल मेहता यांच्यासोबत जुळली आहे. आकाश आणि श्लोका लहानपणापासूनचे मित्र आहेत. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला आहे. ९ मार्च, शनिवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्ट येथे जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

वाचा – आकाश-श्लोकाच्या लग्नाची तारीख ठरली हो…!

डिसेंबरमध्ये इशाचे लग्न झाले

दरम्यान, गेल्याच वर्षी, १२ डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यांचा विवाह आनंद पीरामल यांच्यासोबत झाला होता. या विवाहाला जगभरातील विविद क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गज उपस्थित होते. अंबानी परिवारात परंपरा आहे की, घरात कोणाचाही विवाह होणार असला तरी, त्या विवाहाचे पहिले निमंत्रण मुंबई सिद्धीविनायकाला दिले जाते. त्यामुळेच अंबानी परिवार आकाश अंबानी यांच्या विवाहाची लग्नपत्रिका घेऊन सिद्धिविनायक मंदिरात हजर झाला होता.

वाचा – आकाश अंबानीच्या साखरपुड्याच्या पार्टीत नीता अंबानींचा ठुमका