घरमुंबईमुंबईकडे येणाऱ्या रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द

मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या मुंबईला जाणाऱ्या डेक्कन, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी प्रगती एक्स्प्रेस बंद आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या मुंबईला जाणाऱ्या डेक्कन, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी प्रगती एक्स्प्रेस बंद आहेत. मंकी हिल या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, दिवसेंदिवस प्रशासनाने दिलेल्या तारखेत वाढ होत असून ब्लॉक वाढत आहे. आता १६ ऑगस्टपर्यंत पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

भूस्खलन, रेल्वे लाईन डॅमेज आणि पाऊस या कारणास्तव रेल्वेच्या मुंबईला जाणाऱ्या तसेच इतर ठिकाणच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यत्वे पावसामुळे दहा दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबई-पुणे दरम्यान एकही गाडी धावलेली नाही. दोन्ही शहरात दरम्यान धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या मुंबईला जाणाऱ्या काही गाड्या पुणे, दौंड आणि सोलापूर स्थानकापर्यंत धावत आहेत. तसेच कोल्हापूरला पुराचा वेढा पडल्याने तेथील गाडी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दहा दिवसात लाखो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -