घरमुंबईअॅपवर मिळवा मुंबईच्या हवामानाचा अंदाज!

अॅपवर मिळवा मुंबईच्या हवामानाचा अंदाज!

Subscribe

आता मुंबईच्या हवामानाचा अंदाज अॅपद्वारे मिळवता येणार आहे. त्यासाठी मुंबई हवामान अर्थात mumbai weather live या अॅपचे मुंबईमध्ये अनावरण करण्यात आले. मुंबईतल्या हवामानाचे अपडेट्स सांगणाऱ्या अॅपसोबतच चारधाम आणि अमरनाथ यात्रेकरूंसाठीही वेगवेगळे मोबाईल अॅप्लिकेशन लॉँच करण्यात आले.

मुंबई! देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक व्यापाराचा केंद्रबिदु! या मुंबईवर साऱ्यांची नजर. मुंबईमधल्या हवामानाचा मूड देखील काहीसा वेगळाच. कधी काय बदल होईल याचा नेम नाही. त्यामुळे मुंबईच्या हवामाना संबंधीचे सर्व बदल मिळण्यासाठी आता मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे. मुंबई हवामान अर्थात mumbai weather live असे या अॅपचे नाव आहे. त्यामुळे तुम्हाला मुंबई हवामानाबद्दलची प्रत्येक बाब तुम्हाला आता मोबाईलवर कळणार आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने नुकतेच या अॅपचे अनावरण केले. अॅपमुळे मुंबई शहरातील हवामानाच्या अपडेट्समध्ये वादळ, उष्णतेची लाट, अतिवृष्टी आदी गोष्टी मुंबईकरांना कळतील. प्रत्येक ठिकाणाचे महत्त्वाचे सर्व अपडेट्स लाईव्ह पद्धतीने मिळण्यासाठी १०० ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरातील पर्जन्यमानाची आकडेवारीसुद्धा आता उपलब्ध होणार आहे. तापमान, आर्द्रता, वादळी वाऱ्यांचा वेग आदी निकषावर आधारीत अपडेट्सही या अॅपद्वारे उपलब्ध होतील.

यात्रेकरूंसाठी देखील अॅप

मुंबईतल्या हवामानाचे अपडेट्स सांगणाऱ्या अॅपसोबतच चारधाम आणि अमरनाथ यात्रेकरूंसाठीही वेगवेगळे मोबाईल अॅप्लिकेशन लॉँच करण्यात आले. अनेकदा यात्रेदरम्यान हवामानाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे यात्रेकरूंची मोठी गैरसोय होते. यापूर्वी देखील असेच अनुभव यात्रेकरूंना आलेले आहेत. पुढील काळात हवा प्रदुषणाच्या बाबतीत आपत्कालीन अंदाज वर्तवणारी यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही यंत्रणा ऑक्टोबरपर्यंत पुर्ण होईल अशी माहिती विभागाचे सचिव एम. राजीवन यांनी दिली. विभागामार्फत भूकंप, त्सुनामी याचा अधिक अचुक अंदाज वर्तवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही माहिती विभागाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -