घरमुंबईमाहिमकर दुकानदारांच्या मदतीने जागृती मोहीम

माहिमकर दुकानदारांच्या मदतीने जागृती मोहीम

Subscribe

बर्‍याचदा चेन स्नॅचिंगसारखे प्रकार भर वस्तीत घडतात आणि चोरटे पसार होतात. अशा वेळी परिसरात असणारे भाजीवाले, दुकानदार यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम पोलीस करत आहेत. हद्दीतल्या प्रत्येक भागात भेट देऊन तेथील स्थानिकांना अशा वेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

माहीमसारख्या गजबजलेल्या परिसरात एकाच रात्री सहा वाहने फोडल्याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा मागोवा घेण्यासाठी माहीम पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून, या मोहिमेत स्थानिक दुकानदार आणि नागरिकांचा सहभाग पोलीस घेत आहेत. या घटना घडत असताना गेल्या काही दिवसांपासून माहिम परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे माहिम पोलीस सतर्क झाले आहेत. माहिम परिसरात लोकांना भेटून स्वतः पोलीस वेगवेगळ्या सूचना करत आहेत. भाजी विक्रेते, खासगी दुकानदार आणि अन्य दुकानदारांना एकत्र बोलावून त्यांना पोलिसांना सहाय्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

माहिमनजिक कटारिया मार्ग चौकात अनेक भाजी विक्रेते आणि दुकानदार आहेत. या सगळ्यांना एकत्र करून पोलिसांनी चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. गस्तीवरील पोलीस नागरिक आणि दुकानचालकांच्या मदतीने परिसरावर निगराणी ठेवणार आहेत. माहिम पोलिसांनी भुरट्या चोरांवर नजर ठेवण्यासाठी फेरिवाल्यांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न हा मुंबई पोलिसांमधील पहिला प्रयत्न नाही. अशा प्रकारे पोलीस वारंवार जनतेचे सहकार्य घेत असतात. यामाध्यमातून पोलिसांचे खबरेही वाढतात.

- Advertisement -

बर्‍याचदा चेन स्नॅचिंगसारखे प्रकार भर वस्तीत घडतात आणि चोरटे पसार होतात. अशा वेळी परिसरात असणारे भाजीवाले, दुकानदार यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम पोलीस करत आहेत. हद्दीतल्या प्रत्येक भागात भेट देऊन तेथील स्थानिकांना अशा वेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सतीश कोटकर, पोलीस उपनिरीक्षक, माहीम पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -