घरमुंबईलोकलच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने फेकली बॅग; वाशी स्थानकात आग, धूर आणि भीती

लोकलच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने फेकली बॅग; वाशी स्थानकात आग, धूर आणि भीती

Subscribe

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळे ही आग लागल्याचे आता समोर आले आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, ऐन कार्यालयीन वेळेतच हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला.

वाशी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाला. पेंटाग्राफने पेट घेतला आणि बघता-बघता सगळीकडे धूर पसरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीने तात्काळ हालचाल करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

- Advertisement -

वाशी रेल्वे स्टेशनवर लोकलच्या पेंटाग्राफला आग; वाहतूक विस्कळीत

वाशी रेल्वे स्टेशनवर लोकलच्या पेंटाग्राफला आग; वाहतूक बंद

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 8, 2019

ही बॅग नेमकी कुणी आणि का फेकली, याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कुणीतरी कमरेचा बेल्ट ओव्हरहेड वायरवर फेकल्याने वायर तुटून लोकलचा खोळंबा झाला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रेल्वे मार्गांलगत गस्त घालणे सुरू केले आहे. तरीही या घटना समोर येत असल्याने लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -