घरमुंबई२९ आंदोलकांना जामीन मंजूर

२९ आंदोलकांना जामीन मंजूर

Subscribe

बोरिवली कोर्टाचा निर्णय,सात हजारांच्या जामीनावर सुटका

आरे वृक्ष तोडविरोधात आंदोलन करणार्‍या अटक २९ जणांना बोरिवली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरे कॉलनी मेट्रो 3 कारशेडसाठी शुक्रवारी झाडे तोडली. त्याच्याविरोधात आंदोलन करणार्‍या २९ जणांना अटक केली होती. त्या सर्वांना कोर्टाकडून रविवारी जामीन मंजूर करण्यात आला. मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाली असून त्यास विरोध करणार्‍या पर्यावरणप्रेमींना रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागली. शनिवारी सकाळी जमावबंदीचे आदेश लागू करून पोलिसांनी २९ जणांना अटक केली होती. या आंदोलकांची सात हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली.

आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आरेमधील झाडे तोडण्याविरोधात आंदोलकांनी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्या पत्राची दखल घेतली असून सोमवारी तातडीने आरेबाबत सुनावणी ठेवली आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कुटुंबियांची पत्रकार परिषद
मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करताना अटक झालेल्या २९ जणांच्या कुटुंबियांनी रविवारी गोरेगावमध्ये पत्रकार परिषद देखील घेतली होती. मुंबई पोलीसांनी चुकीच्या पद्धतीने २३ पुरूष आणि ६ महिलांना अटक केल्याचा आरोप या परिषदेत करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांसह स्थानिक आदिवासींचाही समावेश आहे.

जमावबंदी तोडली
आरे येथील वृक्षतोडीला शुक्रवारी रात्री सुरुवात करण्यात आली. ज्यानंतर पर्यावरणप्रेमींनी या प्रकाराला विरोध दर्शवत आरे बचाव आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाविरुद्ध पर्यावरणप्रेमींनी हा लढा उभा केला. एका रात्रीत ४०० पेक्षा जास्त झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांचा संताप उफाळून आला होता. दरम्यान, शनिवारी २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या सगळ्यांना बोरीवली न्यायालयापुढे हजरही करण्यात आले. ज्यानंतर सगळ्या आंदोलकांना बोरीवली कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर ताब्यात
आरेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रविवारी आरे येथे गेले होते. मात्र तेथे जमाव बंदी लागू असल्यामुळे त्यांना आरेत जाण्यापासून मनाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -