घरमुंबईकोरोनामुळे मंत्रालयाची कामं चालणार WhatsApp आणि SMS द्वारे!

कोरोनामुळे मंत्रालयाची कामं चालणार WhatsApp आणि SMS द्वारे!

Subscribe

सरकारी आदेश निघाल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळणार असून कामकाजालाही वेग येण्याची शक्यता

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून त्याचा चौथा टप्पा देखील संपला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनमधील नियमांमध्ये काहीसे बदल करत त्यात शिथिलता आणली आहे. यासह महाराष्ट्र सरकारने पुनश्च हरिओम म्हणत काही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाजही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच कामकाजात आणि जीवनशैलीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

शासकीय ई मेल सोबतच WhatsApp,SMS द्वारे कामं होणार

दरम्यान, संपुर्ण राज्याचे कामकाज हाताळले जाते ते मंत्रालयातून… मात्र सध्या मुंबईत कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना बहुतांश कर्मचाऱ्यांना आता घरातूनच कामकाज करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय ई मेल सोबतच आता WhatsApp आणि SMS च्या माध्यमातून कामं करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात एक आदेश जारी करण्यात आला असून त्यामाध्यमातून सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह सर्व विभागांना व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी घरातूनच कामकाज करण्यास सांगितले जात आहे. मंत्रालयातील कामकाज आतापर्यंत ई मेल व्यतिरिक्त WhatsApp आणि SMS च्या माध्यमातून होत होते. मात्र त्याद्वारे होणाऱ्या माहितीचे आदान-प्रदान अधिकृत मानले जात नव्हतं. मात्र कोरोना व्हायरसमुळे बदलती परिस्थिती लक्षात घेऊन अशा प्रकारच्या कामकाजास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांनाही मिळणार दिलासा 

सरकारी आदेश निघाल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळणार असून कामकाजालाही वेग येण्याची शक्यता आहे. तसेच अधिकारी घर बसल्या प्रस्ताव तयार करून ते वरिष्ठांना मान्यतेसाठी WhatsApp आणि SMS च्या माध्यमातूनही पाठवू शकतात. शासकीय ई मेलद्वारे प्रस्ताव पाठवल्यावर त्याची माहिती संबंधितांना WhatsApp आणि SMS च्या माध्यमातून कळवावी, असे देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

या निर्णयासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले असून आठवड्यातून एक दिवसही कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण आठवड्याची गैरहजेरी लावण्यात येण्याचे आदेश देखील शुक्रवारी राज्य सरकारने जारी केले.


गैरहजर राहिल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार; राज्य सरकारचा आदेश!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -