अबब…बेस्टच्या बसेसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे वाजले तीन तेरा

बेस्टच्या बसेसमध्ये 'सोशल डिस्टन्सिंग' नसल्यामुळे बेस्ट कामगारांचे आरोग्य धोक्यात आहे.

Mumbai
best bus staff faces difficulty in traveling
बेस्टच्या बसेसमध्ये 'सोशल डिस्टन्सिंग'चे वाजले तीन तेरा

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत बेस्ट बसेस धावत आहेत. परंतु, बेस्टच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक बसेसमध्ये तुफान गर्दी होत असल्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे बेस्टच्या कामगारांना देखील कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. बेस्टकडून सोशल डिस्टन्सिंगची पूर्ती वाट लागली आहे. विशेष म्हणजे अनेकदा तक्रारी करून देखील बेस्ट प्रशासनाला जाग येत नसल्याने बेस्टच्या कामगारांना कोरोनाची लागण झाल्यावर बेस्टला जाग येणार का? असा प्रश्न बेस्ट कामगार संघटनाकडून करण्यात येत आहे.

बेस्ट कामगारांचे आरोग्य धोक्यात

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. परंतु, अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मुंबई बेस्ट अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. गर्दी होऊ नये, असे आव्हान केले जात असताना देखील बेस्टच्या बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग’चे तीन तेरा वाजवले आहेत. याबाबत बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायण कहार यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला सांगितले की, ‘कोरोना रोग संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने गर्दी न करण्याचे आव्हान केले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनाने त्यासाठी योग्य ते नियोजन केलेले नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या काही गाड्या रिकाम्या जात आहेत. तर काही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विक्रोळीवरून बॅकबेला सकाळी ७ वाजता जाणाऱ्या बस मध्ये दररोज सकाळी गर्दी असते. तसेच कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात येथून विरारला जाणाऱ्या बसमध्ये ही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बेस्टचा कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे’.

बेस्ट गंभीर नाही

अत्यावश्यक सेवेसाठी धावणार्‍या बसमध्ये एक किंवा दोन प्रवासी असतात अन्यथा ती बस रिकामी धावते. ज्या ठिकाणी प्रवासी कमी आहेत तेथील बस कमी करून ज्या ठिकाणी प्रवासी जास्त आहे. त्या ठिकाणी बस वाढवायला हव्यात. याबाबत वारंवार बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पण त्याची दखल घेतली जात नाही. बेस्टच्या कामगारांना कोरोनाची लागण झाल्यावर बेस्टला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डेपोत बसण्याची व्यवस्था नाही

कामगारांना बेस्ट आगारात बसण्यास जागा नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट डेपोमध्ये कामगारांसाठी जागेची व्यवस्था नसल्यामुळे बेस्ट कामगार गर्दी करून बसत आहे. आवश्यक नसताना मोठ्या प्रणात डेपोत कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येत आहे. मात्र, कसलीही मूलभूत व्यवस्था बेस्ट कामगारांना पुरवण्यात येत नाही, असा आरोप बेस्ट कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे.


हेही  वाचा – धक्कदायक! १२ तासात कोरोनाचे ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण