भाजपाच्या विशेष कार्यसमिती बैठकीला सुरुवात

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज, रविवारी भाजपकडून मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. यात भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा सहभागी झाले असून ते भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Mumbai
bjp
भाजपची महासभा

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज, रविवारी भाजपकडून मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. यात भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा सहभागी झाले असून ते भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, सरोज पांडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित आहेत. ही बैठक गोरेगावच्या नेस्को येथे पार पडत आहे.

गोरेगाव नेस्को येथे भाजपाची विशेष कार्यसमितीची बैठक

गोरेगाव नेस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विशेष कार्यसमिती बैठकीबाबत गृह राज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधीने…

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜುಲೈ 20, 2019

भाजपची महाजनादेश यात्रा 

लोकसभा निवडणुकीतील बंपर यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढणार आहेत. भाजपाची महाजनादेश यात्रा १ ते ३१ ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते बैठकीसाठी मुंबईमध्ये

महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते बैठकीसाठी मुंबईमध्ये

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜುಲೈ 20, 2019