घरमहाराष्ट्रगोंदियात रस्त्यावरून भरधाव एसटी घसरली; ५ जण जखमी

गोंदियात रस्त्यावरून भरधाव एसटी घसरली; ५ जण जखमी

Subscribe

गोंदियामध्ये चिखलाच्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरल्याने अपघात झाला. या अपघातात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

गोंदियामध्ये चिखलाच्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरल्याने अपघात झाला. या अपघातात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. आज, रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मलपुरी ते गराडा दरम्यान रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे ही बस रस्त्यावरून घसरू लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवच कसेबसे नियंत्रण मिळवल्याने ही गाडी रस्त्यावरून उतरली.

तिरोडा आगाराची एमएच ४०–९८७४ या क्रमांकाची एसटी बस आपल्या पहिली फेरीसाठी सुकडीहून तिरोड्याच्या दिशेने निघाली होती. पण मलपुरी ते गराडा दरम्यान रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे ही बस घसरली. यात राज बिसेन (वय १३, राहणार बाळापूर), समुर बिसेन (१३, डोंगरगाव), तारेंद्र रहांगडाले (१३, डोंगरगाव), हिमानी उके (१३, सुकडी) आणि अन्य एक असे ५ जण जखमी झाले. यावेळी एसटीत सुमारे ३५ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, अपघाताबाबत एसटी आगाराला माहिती देऊन देखील २ तासांपर्यंत मदतीसाठी वाहन पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -