भाजपा आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; मुंब्र्यातून दोघांना अटक

या प्रकरणी आज दोघांना मुंब्र्यातून अटक

भाजपाचे नेते आणि आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. सोमवारपासून सतत धमकीचे फोन येत असल्याने वांद्रे पोलिसांत त्यांनी तक्रार दिली होती. दरम्यान याप्रकरणी दोघांना मुंब्र्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार सातत्याने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत होते.

शिवसेनेला ठणकावून सांगताना शेलार असे म्हणाले की, ठाकरे सरकारला नेहमीच अंगावर घेणाऱ्या आशिष शेलारांनी नेहमीप्रमाणे आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. तर आज तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाल्याने तुम्हाला प्रमाणपत्राची खरी गरज आहे, असे प्रत्युत्तर आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिले आहे.


निसर्गाला मारून विकासाची वीट रचता येत नाही; सेनेचा भाजपवर निशाणा