घरमुंबईमुंबई महापालिकेचे बॉलिवूड स्टाईलमध्ये आवाहन

मुंबई महापालिकेचे बॉलिवूड स्टाईलमध्ये आवाहन

Subscribe

मुंबईकरांना नेहमीचं कोणकोणत्या समस्येला तोंड द्यावे लागतं आहे. मग ती पाण्याची असो किंवा प्लास्टिकची. तसंच आता आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार २०५० सालापर्यंत मुंबई पाण्याखाली जाणार अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या काळात पर्यावरण्याच्याबाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून बीएमसीने आपल्या हटके अंदाजात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. बीएमसीने सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती केली असून चित्रपटच्या नावाचा वापर केला आहे. बीएमसीने हे पोस्टर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आला होता. मात्र तरीदेखील लोक सरास प्लास्टिक वापर करत आहेत. म्हणून बीएमसीने ‘प्लास्टिक से डरना जरुरी है’ अशा आशयाचा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘डरना जरूरी है’ या चित्रपटच्या पोस्टरचा वापर केला आहे.

- Advertisement -

तसंच या मायानगरीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. म्हणून अनेक प्रकारच्या डासांची उत्पत्ती होत असून मुंबईकरांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. बीएमसीकडून हे घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असतात. मात्र तरी देखील घाणीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे बीएमसीने ‘स्त्री’ या चित्रपटाचा पोस्टर वापरून ‘ओ मच्छर कल आना’ असं म्हटलं आहे.

- Advertisement -

रस्त्यांवर थुंकण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे. त्यालाचं अनुसरुण ‘फूँक’ या चित्रपटाचे नाव ‘थूँक’ असं वापरलं आहे.

पाणी वाचवणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी मुसळधार पाऊस कोसळला असला तरी मागील महिन्यांत मुंबईतील काही भागांमध्ये पाणी कपात करण्यात आले होते. त्यामुळे पाणी जपून वापरणे खूप महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर बीएमसीने हॉलिवूडच्या ‘नन’ या चित्रपटच्या पोस्टरचा वापर करून पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे.

अशा हट्के अंदाजाचे बीएमसीने ट्विट केलं आहे.

या ट्विटला मुंबईकरांना तुफान प्रतिसाद दिला आहे. पाहा काय म्हणाले मुंबईकर….

 


हेही वाचा – मुंबई २०५० मध्ये पाण्याखाली बुडणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -