घरगणेशोत्सव २०१९गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्या सोडण्यासाठी केंद्राची आडकाठी!

गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्या सोडण्यासाठी केंद्राची आडकाठी!

Subscribe

मध्य रेल्वेने २०८ फेर्‍या चालविण्याचा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी रेल्वे बॉर्डाकडे पाठविण्यात आलेल्या होता.मात्र आता प्रस्तावाला केंद्राकडून आडकाठी टाकण्यात आली आहे.

गणेशोत्सावासाठी कोकणात ट्रेन सोडण्याची मागणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन युनिटचे संचालक अभय यावलकर यांनी रेल्वे प्रशासनाला केली होती.यावर मध्य रेल्वेने २०८ फेर्‍या चालविण्याचा प्रस्ताव सुध्दा अंतिम मंजूरीसाठी रेल्वे बॉर्डाकडे पाठविण्यात आलेल्या होता.मात्र आता प्रस्तावाला केंद्राकडून आडकाठी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणी आण्यासाठी हा प्रयत्न सुरु असल्याचे बोलण्यात येत आहे. परिणामी मुंबईतून कोकणात जाणारे चाकरमांनी चांगलचे संभ्रमान पडले आहे. सरकारचा या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील चाकरमान्यांकडून संताप व्यक्त

गणेशोत्सव हा कोकणातील एक महत्त्वाचा सण आहे. या सणासाठी मुंबई, पुण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जातात. त्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ट्रेन सोडण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन युनिटचे संचालक अभय यावलकर यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने ११ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या २०८ फेर्‍यांच्या नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. तसा प्रस्ताव तयार करून मध्य रेल्वेने अंतिम मंजुरीसाठी रेल्वे महामंडळ आणि केंद्रीय गृह विभागाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला कोणत्याही क्षणी परवानगी मिळण्याची शक्यता सुध्दा त्यांच्याकडून वर्तवली होती.मात्र अचानक दोन दिवस उलटून याप्रस्तावाल मंजूरी दिली नाही. तसेच मध्य रेल्वेच्या या विषेश रेल्वे गाडयांचे वेळापत्रक सुध्दा समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.त्यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची हिरमोड झालेली आहे. विशेष रेल्वे गाड्या चालविण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील क्वारंटाईनचा कालावधी पाहता सलग सप्टेंबरपर्यंत ट्रेन चालविणे शक्य नसल्याने केवळ १२ ऑगस्टपर्यंत गाड्या चालवून उपयोग काय ? असे रेल्वे बोर्डाचे म्हणणे पडले आहे. तसेच राज्य सरकारने १३ ऑगस्टनंतरही कोकणात जाण्यासाठी ४८ तासांत कोरोनाची टेस्ट करण्याचा सुचविलेला पर्यायही रेल्वेसाठी गैरसोयीचा ठरला आहे. कारण ट्रेनच्या प्रवाशांमध्ये कोण निगेटिव्ह आहे, त्यांची पडताळणी कशी करायची तसेच तेवढी यंत्रणा रेल्वेकडे नसल्याने रेल्वे बोर्डाने यातून सुटका करून घेण्यासाठी हात वर केल्याचे म्हटले जात आहे. मग प्रस्ताव कशाला पाठविला होता असा प्रश्न कोकणातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

चाकरमान्यांची भ्रमनिरास

राज्य शासनाने एकदाच स्पष्ट सुचना देणे गरजेचे आहे. राज्यातील एका खात्याने रेल्वेला दिलेले परवानगी पत्र व त्यानंतर रेल्वेने तयार केलेले वेळापत्रक समाजमाध्यमांवर व बातम्यांमधून देखील प्रसारित झाले. त्यामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या व त्यांनी प्रवासाची तयारी सुरू केली. पण सोमवारी आलेल्या बातमीने त्यांचा भ्रमनिरास झाला. पण अजूनही कोणीही माध्यमांसमोर येऊन अधिकृत भूमिका मांडत नाही, हे दुर्दैवी आहे. तरी, संबंधितांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सामान्य जनतेला सुस्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. तसेच, आता गावी गेलेल्या लोकांपेक्षा कितीतरी पट नागरिक आधीच गावी गेलेले आहेत. ते सर्व गणेशोत्सवानंतर शहरांकडे येणार. त्यामुळे, रेल्वे सेवा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया दैनिक आपलं महानगरशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली आहे.

कोकणात गाड्या सोडण्यासाठी आमचे नियोजन आहे. आम्ही पुढील सुचनेची प्रतिक्षा करत आहोत.
शिवाजी सुतार,मुख्य जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -