घरमुंबईकोरोनाला रोखत हिल गँगची घाटातली मोहीम फत्ते

कोरोनाला रोखत हिल गँगची घाटातली मोहीम फत्ते

Subscribe

मध्य रेल्वेच्या भोर घाट(कर्जत आणि खंडाळा दरम्यान) आणि थल घाटातील (कसारा आणि इगतपुरी दरम्यान) हिल गँग  त्यांच्या रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन रॅपलिंगद्वारे रेल्वे संरक्षेतील अत्यंत आव्हानात्मक कार्य करीत आहे.

मध्य रेल्वेच्या भोर घाट(कर्जत आणि खंडाळा दरम्यान) आणि थल घाटातील (कसारा आणि इगतपुरी दरम्यान) हिल गँग  त्यांच्या रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन रॅपलिंगद्वारे रेल्वे संरक्षेतील अत्यंत आव्हानात्मक कार्य करीत आहे.  हे संरक्षा सैनिक, पुणे आणि भारताच्या दक्षिण भागांकडे तसेच नाशिक व भारताच्या उत्तर भागांकडे जाणा-या गाड्यांना सुरळीत व सुरक्षित रेल्वे मार्ग सुनिश्चित होण्यासाठी वर्षभर  काम करतात.  हे हिल गँगचे सदस्य डोंगरावर रॅपेलिंगमधील कौशल्याच्या माध्यमातून, रुळांवर पडण्याची शक्यता असलेल्या सैल व धोकादायक दरडी  काढून टाकतात, भूस्खलन होण्याची शक्यता असलेली चिखल साफ करतात, पाण्याचा निचरा होण्यासाठी अड़थळे  साफ करणे इत्यादी कामे करत विशेषता पावसाळ्यात होणा-या कोणत्याही अघटित घटना टाळतात.

मध्य रेल्वेचे घाटांतील योद्धे

हिल गॅगचे सदस्य दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत रुळां शेजारील उंच आणि उभ्या डोंगरांवर चढतात आणि रॅपेलिंगद्वारे सैल आणि असुरक्षित दरडी  शोधून काढतात आणि लाल रंगाने ते चिन्हांकित करतात.  त्यानंतर, एप्रिल आणि मे महिन्यात ते दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेवून असे चिन्हांकित सैल आणि असुरक्षित दरड पाडतात.  त्यानंतर ह्या दरडी त्यासाठी असलेल्या विशेष गाडीने मोकळे केले जातात.  यावर्षी केवळ भोर घाट आणि थल घाटात ६५० हून अधिक सैल दरड़ी शोधले गेले आणि ते दरड ३ वॅगनच्या दरडी विशेष गाडीने दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेत ६० दिवसांत साफ केले.

- Advertisement -

भोर घाट आणि थूल घाटात प्रत्येकी दहा हिल गॅगनी हे महत्वाकांक्षी आणि धाडसी कार्य पूर्ण केले आहे.  हे कार्य पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली सुरक्षा गीअर्स आणि उपकरणे म्हणजे सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट (हार्नेस), दुर्बिणी, १०० मीटर दोरी, हँड ग्लोव्हज, सेफ्टी जॅकेट, कटवनी, पहार, फोंक, रेड पेंट, ब्रश, प्रथमोपचार बॉक्स,  ५ किलो घन,  वेगवेगळ्या आकाराचे हातोडे, शिटी, छिन्नी, वेगवेगळ्या आकाराच्या कु-हाडी , वायरचा पंजा, हँड सिग्नलचा  लाल / हिरवा झेंडा, फावडे, जाम बावटा व घमेला या वस्तू समाविष्ट आहेत.  पावसाळ्यात आणि त्यानंतर हिल गॅगचे सदस्य विखुरलेल्या मोकळ्या दरडींचे स्कॅनिंग आणि आवश्यकतेनुसार तोडण्याचे काम करतात, चोक-अप कॅच वॉटर ड्रेन व नाले साफ करतात, वृक्षतोड आणि पुलाची साफसफाई करतात.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातिल पर्वत रांगाचे मुख्य हे सह्याद्री रेंज आहे, या रेंजमध्ये अनेक ‘घाट’ आहेत, त्यापैकी भोर घाट आणि थल घाट उल्लेखनीय आहेत.  या घाटांवरुनच मुंबईहून जाणारी रेल्वेगाडी अनुक्रमे पुणे आणि नाशिकला पोहचते.   या घाटांमधील रस्ते आणि रेल्वेसाठीचा प्रवास दोन्ही मोठे आव्हान आहे.  या घाटांमधून जाणारे उभे ग्रेडियंट रेल्वे मार्ग, मध्य रेल्वेला एक अनन्य आव्हान आहे.  शिवाय, मुसळधार पावसाच्या वेळी प्रचंड  उतारामुळे जड दगड खाली जायला लागतात आणि छोट्या छोट्या दरडी सुटतात.  मोठमोठे दरडी हिल गॅगद्वारा  छिन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने तुकडे केले जातात आणि   मोकळे   करतात, तर गाड्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी छोट्या दरडी पाडल्या जातात.

- Advertisement -

बर्यााच गिर्यारोहकांसाठी माउंटन रॅपलिंग हे एक साहसी कार्य आहे, परंतु मध्य रेल्वेच्या या हिल गॅग द्वारे रेल्वेची संरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे कार्य केले जात आहे.   रेल्वेतील हे कामगार सैनिक कठीण हवामानातील परिस्थितीत घाम गाळतात म्हणून या घाटांतून जाणा-या गाड्या कोणत्याही अनुचित घटनेपासून वाचतात.  मध्य रेल्वेच्या हिल  गँगसाठी दरवर्षी हे आव्हान असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -