सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ; रेल्वे पोलिस हैराण

एकूण सहा वर्षात 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीच्या इतकी किंमतीच्या मालमत्ता चोरी झाली आहे.

Mumbai
chain snatching

रेल्वे स्टेशनावर सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईत कोट्यावधी  रुपये खर्च करुन प्रत्येक स्टेशन परिसरात कॅमरे लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा गुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही, उलट वाढले आह्रे. कारण सहा वर्षांत 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीच्या साखळी चोरीच्या घटनेची नोंद झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस लोहमार्ग पोलीस विभागांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी लोहमार्ग पोलीस विभागाकडे  2013 पासून 2018  पर्यंत मुंबईचे उपनगरीय रेल्वे हद्दीत किती साखळी चोरीचे गुन्हे नोंद झाले आहे,  तसेच किती गुन्ह्याची उघड झाली आहे तसेच किती किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले आहे. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा हस्तगत केले आहे याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात लोहमार्ग पोलीस विभागाचे  शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे.

माहितीप्रमाणे  मुंबईत 1 जानेवरी 2013 पासून डिसेंबर 2018  पर्यंत एकूण 2084 साखळी चोरीचे गुन्हे नोंद झाली असून एकूण सहा वर्षात 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीच्या इतकी किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले आहे. तसेच फक्त 860 गुन्ह्याची उघड झाली असून पोलिसांना फक्त 3 कोटी 32 लाख 39 हजार 921 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.  म्हणजे फक्त 40 टक्के किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.

वर्षाप्रमाणे चैन स्नेचिंग चोरी गुन्ह्यांची नोंद

2013 मध्ये एकूण 62 साखळी चोरीच्या घटना. 2037885/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 17  गुन्हे उघड झाले आहे तसेच 693250/- इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.

2014 मध्ये एकूण 73 साखळी चोरीच्या घटना. 2367789/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 31  गुन्हे उघड झाले आहे तसेच 953607/- इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.

2015 मध्ये एकूण 244 साखळी चोरीच्या घटना 8692576/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 77  गुन्हे उघड झाले आहे तसेच 2264043/- इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.

2016 मध्ये एकूण 309 साखळी चोरीच्या घटना 12053333/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 123  गुन्हे उघड झाले आहे तसेच 3371908/- इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.

2017 मध्ये एकूण 341 साखळी चोरीच्या घटना 14292631/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 128  गुन्हे उघड झाले आहे तसेच 4033259/- इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.

2018 मध्ये एकूण 314 साखळी चोरीच्या घटना 14927222/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 80  गुन्हे उघड झाले आहे तसेच 3032343/- इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here