घरमुंबईचंद्रकांत पाटलांनी घेतली 'त्या' अभियंत्याच्या कुटुंबियांची भेट

चंद्रकांत पाटलांनी घेतली ‘त्या’ अभियंत्याच्या कुटुंबियांची भेट

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन उपअभियंत्यावर चिखलफेक केल्यामुळे आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत आले असून, आता राज्य सरकार देखील या उप अभियंत्याच्या बाजूने उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन उपअभियंत्यावर चिखलफेक केल्यामुळे आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत आले असून, आता राज्य सरकार देखील या उप अभियंत्याच्या बाजूने उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उप अभियंत्यांची काळजी घेण्याच्या सूचना फोनद्वारे इतर अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

त्या अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नका ?

ही घटना माध्यमातून आणि इतर सोशल मीडियातून समोर आल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदनामी झाल्यामुळे त्या अधिकाऱ्यावर नक्कीच मानसिक ताण निर्माण झाला असेल, त्यामुळे सध्या त्या अधिकाऱ्याच्या पाठिशी राहून त्याला धीर द्या, असे आदेशच चंद्रकांत पाटील यांनी यावेळी फोनद्वारे दिले आहेत. तसेच चंद्रकांत पाटील यांनी या घटनेनंतर स्वतः फोन करून माहिती घेतल्याचेही समजते.

- Advertisement -

म्हणून चंद्रकांत पाटील अधिकाऱ्याच्या पाठीशी –

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या अधिकाऱ्याला मारहाण झाली तर त्याची बदनामी तर होतेच पण त्याच्या कुटुंबाला देखील तो त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी स्वतः इतर अधिकाऱ्यांशी फोन करून त्या अधिकाऱ्याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात जाऊन प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली. तसेच यावेळी त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देखील दिला.

काय आहे प्रकरण –

गुरुवारी आमदार नितेश राणे यांनी महामार्गाची पाहणी करताना रस्ते अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली. एवढंच नाही तर राणे यांनी अभियंत्याला गडनदी पुलाला बांधून ठेवत, महामार्ग सेवा रोड तुझा बाप बांधणार का?, असा सवाल केला होता. त्यानंतर हे वातावरण अधिकच चिघळले असून, या प्रकरणी नितेश राणे यांना अटक देखील करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -