घाटकोपरमध्ये तोतया ‘क्लीन अप मार्शल’चा सुळसुळाट

घाटकोपरमध्ये तोतया 'मार्शल'ची टोळीच सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. 'क्लीन अप मार्शल' योजनेच्या नावाखाली हे तोतया 'मार्शल' पादचाऱ्यांना लुटत असल्याच्या अनेक तक्रारी पादचाऱ्यांनी केल्या असून याप्रकरणी पोलीस पंतनगर पोलीस या 'तोतया' क्लीन अप मार्शलची टोळीचा शोध घेत आहेत.

Mumbai
clean up marshal : fake clean up marshal at ghatkopar
घाटकोपरमध्ये तोतया 'क्लीन अप मार्शल'चा सुळसुळाट

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून ‘क्लीन अप मार्शल’ ही योजना राबविली जात आहे. मात्र अनेकदा या ‘क्लीन अप मार्शल’बाबत अनेक तक्रारी येत असतान, घाटकोपरमध्ये तोतया ‘मार्शल’ची टोळीच सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर कचरा केल्याचे सांगत हे तोतया क्लीन अप मार्शल त्या परिसरातील पादचाऱ्यांकडून पाचशे ते सातशे रुपयांचा दंड उकळत असल्याचे समोर आले आहे. तसेच पैसे देण्यास विरोध केल्यास त्यांच्याकडून मारहाण देखील होत असल्याच्या तक्रारारी समोर आल्या आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या वतीने पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

‘क्लीन अप मार्शल’ योजना

महापालिकेकडून २००७ पासून ‘क्लीन अप मार्शल’ योजना राबविली जात आहे. रेल्वे स्थानक, एसटी डेपो, बाजारपेठ, मंडई अशा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येते. मात्र या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून घटकोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला तीन ते चार जणांची टोळी नागरिकांना लुटत आहे. हे तोतया दिवसभर या परिसरात फिरत असतात. दरम्यान, एखादी साधीभोळी व्यक्ती दिसली का त्यांना दमदाटी करुन त्यांच्याकडून क्लीन अप मार्शल असल्याचे सांगत दमदाटी करतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे, थुंकणारे यांना पकडून त्यांच्याकडून दंड म्हणून पैसे काढले जातात, मात्र त्या व्यक्तीला पैशाची पावती दिली जात नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने विरोध केल्यास त्यांना मारहाणदेखील करणयात केली जात असल्याचे समोर आले आहे.

‘तोतया’ क्लीन अप मार्शलची टोळी

अनेक दिवसांपासून घाटकोपर पूर्व आणि पश्चिम याठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘तोतया’ क्लीन अप मार्शलचा सुळसुळाट सुरु असून, मात्र दिवसाढवळ्या स्थानक परिसरात अशा टोळ्या कशा सक्रिय असतात, असा प्रश्न येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांने केला आहे. तर काहींनी या तोतयांचे फोटो ही काढले आहे. रहिवाशांनी सुरुवातीला केलेल्या तक्रारींकडे पालिकेने दुर्लक्ष केले. मात्र वारंवार तक्रारी येऊ लागल्याने पालिकेला ही बाब गांभर्याने घ्यावी लागली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस या ‘तोतया’ क्लीन अप मार्शलची टोळीचा शोध घेत आहेत.


वाचा – क्लीनअप मार्शलकडून नागरिकांची लूटमार सुरूच!