डोंबिवलीतील बंद असलेली नाट्यगृह तातडीने सुरु करण्याची मागणी

सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीनगरीत गेले दोन महिने महापालिकेचे सावित्रिबाई फुले नाट्यगृह बंद असल्याने रसिकांची निराशा झाली आहे.

Mumbai
savitribai-phule-natya-kdmc
सावित्रिबाई फुले नाट्यगृह (सौजन्य-लोकमत)

सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीनगरीत गेले दोन महिने महापालिकेचे सावित्रिबाई फुले नाट्यगृह बंद असल्याने रसिकांची निराशा झाली आहे. त्यातच हे दिवस आता शालेय नाट्यसंमेलनाचे असल्याने ते पण कुठे घ्यायचे, असा प्रश्न शाळा चालकांपुढे निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराला माध्यमांनी वाचा फोडली. त्यामुळे त्याची दखल घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंत्यांसह अधिकाऱ्यांची टीम तातडीने फुले नाट्यगृहात आली. शहर अभियंत्यांनी फुले नाट्यगृहाची पहाणी करुन काम तातडीने सुरु करुन लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

दोन महिन्यांपासून नाट्यगृह बंद 

गेले दोन महिने सावित्रिबाई फुले नाटगृह बंद असल्याने महापालिकेचे रोज सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. त्यातच डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात शाळांची स्नेहसंमेलनेही घेता येणार नसल्याने विद्यार्थीही नाराज झाले आहेत. या सर्व गोष्टींना माध्यमांनी वाचा फोडली. या बातमीने पालिकेतील अधिकाऱ्यांनी दखल घेतली. नव्याने महापालिकेत सेवेत रुजु झालेल्या शहर अभिंयता स्वप्ना कोळी, प्रकल्पप्रमुख तरुण जुनेजा, शहर अभियंता सुभाष पाटील, विद्युत विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुर्हेकर आदि अधिकारी फुले नाट्यगृहात आले.

वातानुकुलित यंत्रणेचे काम शिल्लक

त्यांनी सर्व नाट्यगृहाची पहाणी करुन नाट्यगृहातील सर्व दिवे आणि इतर सुविधा योग्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फक्त वातानुकुलित यंत्रणेचे काम शिल्लक असल्याने ते तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच ज्या ठेकेदाराला हे काम दिले त्यांना तातडीने काम सुरु करण्यास सांगण्याचे निर्देश त्यांनी दिले. निविदा मंजूर झाली असून मंजूरीची प्रोसेस सुरु करण्यास त्यांनी सांगितले. तसेच येत्या दोन महिन्यात नाट्यगृह तातडीने सुरु करण्यास त्यांनी बजावले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here