घरमुंबईकाँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेसला रामराम

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेसला रामराम

Subscribe

सिनेकलाकार उर्मिला मातोंडर हिने काँग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पाठोपाठ काँग्रेसचे मुंबईतील वजनदार उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे.

मुंबई काँग्रेसला एका दिवशी दोन धक्के बसले आहेत. आज सिनेकलाकार उर्मिला मातोंडर हिने काँग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पाठोपाठ काँग्रेसचे मुंबईतील वजनदार उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. दिल्ली येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याजवळ त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे. एकेकाळी मुंबई काँग्रेसवर वर्चस्व राखणारे कृपाशंकर सिंह गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात होते.

- Advertisement -

उर्मिला मातोंडकरने सोडला काँग्रेसचा ‘हात’

उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उत्तर मुंबई या मतदारसंघातून उर्मिलाला काँग्रेसने उमेदवारीदेखील दिली होती. मात्र पुन्हा एकदा त्या जागेवरून भाजपचे गोपाळ शेट्टी यांची खासदारपदी वर्णी लागली. त्यानंतरही उर्मिलाने काँग्रेसची साथ सोडणार नसल्याचे म्हटले होते. परंतू आज, मंगळवारी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण हा राजीनामा देत असल्याचे तिने म्हटले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.


हेही वाचा – अवघ्या सहा महिन्यात उर्मिला मातोंडकरने सोडला काँग्रेसचा ‘हात’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -