Unlocking मुंबईतून ५७० चार्टर्ड उड्डाणे

airport

देशभरातील लॉकडाऊनच्या अटी व नियम शिथिल झाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात चार्टर्ड प्लेनची मागणी वाढली आहे. जवळपास ३४ देशांमध्ये जाण्यासाठी मुंबईतून चार्टर्ड प्लेनचा वापर झालेला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुंबईतून जवळपास २६ एअरलाईन्सचा वापर करत ६७ हजार ५०० प्रवाशांनी चार्टर्ड प्लेनचा वापर केला आहे. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये प्रवाशांनी प्रवास केला आहे. मध्य आखाती देश, आफ्रिका, युरोप, आशिया, अमेरिका यासारख्या देशांमध्ये प्रवाशांनी प्रवास केला. त्यासोबतच दोहा, दुबई, लंडन यासारख्या शहरांसाठीही सर्वाधिक अशी प्रवाशांची वर्दळ राहिली आहे.

मुंबई छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर २२ आंतरराष्ट्रीय विमाने तर ४ देशांतर्गत विमानांनी लॅण्ड केल्यानंतर या एअरपोर्टवर प्रवासी सुरक्षितपणे तपासण्यात आले. त्यामध्ये इंडिगो, एअर इंडिया, विस्तरा आणि एअर इंडिया एक्सप्रेस आदी एअरलाईन्सच्या फ्लाईटचे प्रवासी या कालावधीत हाताळण्यात आले. तर अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचे असे ३३ हजार ७०० प्रवासी हाताळण्यात आले. देशांतर्गत वाहतुकीचे ९२०० प्रवासी हाताळण्यात आले. या कालावधीत केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचे तंतोतंत पालन केले असल्याचे मुंबई छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या वतीने सांगण्यात आले. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देतानाच प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.