घरमुंबईरेनिटायडिन औषध थांबवा; राज्य आरोग्य सेवा संचालनालयाच्या सुचना

रेनिटायडिन औषध थांबवा; राज्य आरोग्य सेवा संचालनालयाच्या सुचना

Subscribe

रेनिटायडिन घटक कर्करोगाला पुरक असल्याची बाब राज्य आरोग्य सेवा संचालनालयानेही गंभीर घेतली आहे. सर्व जिल्हा, उपजिल्हा आणि राज्य सरकारी हाॅस्पिटलना रेनिटायडिन संबंधित औषधांचा वापर त्वरीत थांबवण्याचे आदेश संचानालयाकडून दिले आहेत. या औषधांचा साठा ही करू नका, असे सांगण्यात आले आहे.

अॅसिडीटीवर देण्यात येणार्या गोळ्यांमध्ये सर्रास रेनिटायडिन घटकांचा वापर करण्यात येत होता. रेनिटायडिन हा घटक कर्करोग पुरक असल्याचे पत्र औषध नियंत्रकांकडून केंद्रीय अन्न व औषध प्रशासन विभागाला पाठवण्यात आले होते. रेनिटायडिन औषधांमध्ये नायट्रोसमाईन इम्प्युरिटीचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. हे घटक मानवी शरीरासाठी घातक असून त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. तसेच अॅसिडिटीवर प्रत्येक तीन भारतीयांमागे १ भारतीय संबंधित डोळ्यांचं सेवन करतो. रेनिटायडिन औषधांत कर्करोगाला पुरक घटक असल्याचे इंटरनॅशनल एजन्सी फाॅर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने मत मांडले. त्यामुळे राज्यातील औषध उत्पादकांची फेर पडताळणी करुन चर्चा करण्याचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल डाॅ. व्ही. जी. सोमाणी यांनी पत्रातून सांगितले होते. रुग्णाच्या आरोग्याला हानिकारक घटक असल्याची माहिती कंपनीला औषध नियंत्रकांकडून मिळाली. त्यामुळे औषध उत्पादनांची विक्री न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संबंधित कंपन्यांच्या प्रवक्त्यांकडून कळवण्यात आले.

- Advertisement -

त्यामुळे राज्य आरोग्य सेवा संचालनालयाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. सुचनांप्रमाणे आरोग्य संस्थांकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या गोळ्या रेनिटायडिन आणि इंजेक्शन रेनिटायडिन च्या साठ्याचा वापर पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात यावा असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा –

अभिमन्यू पवार; संघाचा कार्यकर्ता, फडणवीसांचा पीए ते विधानसभेचा उमेदवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -