आदीवासी पाड्यातही दिवाळी साजरी

ठाण्यातील येऊर येथील दुर्गम भागातील पाटोणापाडा, नारोळी पाडा, जांभूळ पाडा या पाड्यावर सुमारे १७५ आदिवासींच्या घरी दिवाळीचे साहित्य वाटप देऊन आदिवासी कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद देण्याचे काम ठाण्यातील निसर्ग क्रीडा संवाद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

Mumbai
adiwasi in thane
ठाण्यातील आदिवासी पाड्यातही दिवाळी

ठाण्यातील येऊर येथील दुर्गम भागातील पाटोणापाडा, नारोळी पाडा, जांभूळ पाडा या पाड्यावर सुमारे १७५ आदिवासींच्या घरी दिवाळीचा फराळ, दिवाळी अंक, उटणे, पुस्तके भेट देऊन आदिवासी कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद देण्याचे काम ठाण्यातील निसर्ग क्रीडा संवाद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे आदीवासी पाड्यांमध्येही दिवाळीचा आनंद व्यक्त होत होता. गेल्या पाच वर्षापासून संस्था हे कार्य करत असल्यामुळे प्रत्येक वर्षी येथील आदिवासी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.

सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला 

दरवर्षीप्रमाणे यंदाही घरी येणार म्हणून आदिवासींनी अंगण सजवले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. संस्थेतील सदस्यांनी नक्षीदार आकाशकंदील फुलबाज्या लावत गप्पा-गाणी करत आदिवासी कुटुंबातील ताई, भाऊ मुलांसोबत संस्थेतील सदस्य कुटुंबातील ताई, भाऊ मुलांनी परंपरागत पध्दतीने ओवाळून भाऊबीज केली. यावेळी व्यास क्रिएशनने दिवाळी साहित्य भेट कार्यक्रमाला आदिवासी मुलांना गोष्टीची पुस्तकं भेट दिली.

समाजाच्या विकासात खारीचा वाटा उचलावा या भावनेतून काही तरुणांनी एकत्र येऊन निसर्ग क्रीडा संवाद संस्थेची स्थापन केली आहे. त्याच माध्यमातून गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. आमच्या या उपक्रमामुळे आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. पाड्यावर आनंदाची लहर निर्माण होते. कोणीतरी आपल्या पाठीशी आहेत. या भावनेतून त्यांच्या जगण्याचा आनंद वाढतो. यामुळे समाधान मिळते.
– प्रा. एकनाथ पवळे, संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक

धान्य वाटपही केले

येऊर येथील विवेकानंद बालकाश्रम येथे संस्थेतर्फे तांदूळ, कांदे, बटाटे साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमात ज्ञानसाधना महाविद्यालय, शिवाई ज्युनिअर कॉलेज, वसंतविहार ज्युनिअर कॉलेज, ई विद्यार्थी इतिहास तज्ज्ञ सदाशिव टेंटविलकर, रवी बाविस्कर माजी मुख्याध्यापक, जगदीश थोरात उपशरप्रमुख, प्रशांत घुगरे, संतोष पाटील उपविभागप्रमुख, विक्रांत पाटील, संस्थेचे सचिव मारुती चव्हाण, खजिनदार सुधाकर गव्हाणे, सभासद प्रदीप महाले, मारुती साबणे, संगीता सावंत, स्मिता पाटील, नीलिमा जाधव, रवी देसले, सुरेश सावंत, अजित देशमुख, फुटबॉल प्रशिक्षक किशोर चव्हाण सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here