घरताज्या घडामोडीडोंबिवलीत बॅगेत सापडलेला मृतदेह ठाण्यातील व्यक्तीचा

डोंबिवलीत बॅगेत सापडलेला मृतदेह ठाण्यातील व्यक्तीचा

Subscribe

डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळ परिसरात गुरूवारी सकाळी बॅगेत एका इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या काही तासातच पोलिसांनी या मृतदेहाचा छडा लावला असून हा मृतदेह ठाण्यातील नागरिकाचा असून उमेश पाटील वय ४० असे त्या इसमाचे नाव आहे. त्या इसमाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

ठाण्यातील कोपरी परिसरातील संतोषी माता सोसायटी परिसरात राहणारे उमेश पाटील हे ४ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र रात्री उशिरा पर्यंत ते घरी आले नाही. त्यामुळे कुटूंबियांनी पाटील हे हरविल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात नोंद केली होती. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासल्यानंतर ते डेांबिवलीत असल्याचे आढळून आले होते. मात्र सकाळी बावनचाळ परिसरातील एका बॅगेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुटूंबियांना मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेहाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत.  त्यामुळे पाटील यांची हत्या केाणी आणि कशाच्या कारणातून केली? याचा तपास विष्णुनगर पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

हे वाचा – डोंबिवलीच्या जावयासमोर समस्या मांडण्याआधीच डोंबिवलीकरांना पोलिसांनी अडवलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -