घरमुंबईडॉ. मनोहर जोशी यांना 'डी. लिट' पदवी प्रदान

डॉ. मनोहर जोशी यांना ‘डी. लिट’ पदवी प्रदान

Subscribe

डॉ. मनोहर जोशी यांना आज डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे 'डी. लिट' या सन्माननीय पदवीने गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांनी स्वतः भेट घेऊन आपल्या हस्ते ही पदवी डॉ. जोशी यांना प्रदान केली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व शिक्षणतज्ज्ञ डॉ. मनोहर जोशी यांना आज डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डी. लिट’ या सन्माननीय पदवीने गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांनी स्वतः भेट घेऊन आपल्या हस्ते ही पदवी डॉ. जोशी यांना प्रदान केली.

जोशींनी मानले आभार

राजकीय व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. जोशींना ही पदवी प्रदान करण्यात आली असून, “जीवनात मी शिक्षणाला खूप महत्त्व दिले त्याची या विद्यापीठाने दखल घेतल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो; तसेच डी. वाय. पाटील यांच्यासारख्या शिक्षणसम्राटांच्या हस्ते ही पदवी प्रदान होणं हे माझं भाग्य आहे.” या शब्दांत डॉ. जोशी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पदवी प्रदान प्रसंगी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. शिरीष पाटील व डॉ. जोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -