घरताज्या घडामोडीमुंबईच्या मेट्रोतून अमली पदार्थांची तस्करी

मुंबईच्या मेट्रोतून अमली पदार्थांची तस्करी

Subscribe

अमली पदार्थ तस्कारांनी वाहतुकीचा नवीन पर्याय निवडल्याचे उघडकीस आले आहे. आता मुंबईच्या मेट्रोतून अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याच समोर आले आहे.

मुंबईतील गारेगार मेट्रोतून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अमली पदार्थ तस्करांनी वाहतुकीचा नवीन पर्याय निवडला असल्याचे समोर आले आहे. घाटकोपर हून मेट्रोतून अमली पदार्थ नेणाऱ्या आरोपीला कर्तव्य दक्ष मेट्रो कर्मचाऱ्यांमुळे अमली पदार्थ हस्तगत करण्यात यश आले आणि आरोपीला अंधेरी पोलिसांनी रंगे हाथ अटक केली. शैलेश पानसरे असे या आरोपीच नाव आहे.

नक्की काय घडलं?

आरोपी शैलेश पानसरे हा घाटकोपर मेट्रो स्थानकातून अंधेरीसाठी प्रवास करत असताना तो सुरक्षा चाचणी जवळ आला होता. त्यावेळीघाटकोपर मेट्रो स्थानक येथे मेट्रो सुरक्षा कर्मचारी यांना सुरक्षा तपासणी दरम्यान आरोपी इसमाकडे संशयास्पद रित्या अमलीपदार्थ सदृश्य पदार्थ दिसून आल्याने मेट्रो सुरक्षा अधिकारी यांनी त्वरित याची माहिती अंधेरी पोलीस ठाणे येथे दिली. या माहितीवरून अंधेरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंधेरी मेट्रो स्टेशनला पोहचले आणि सदर इसमाकडील वस्तू पाहिली असता तो पदार्थ हे गांजा असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून आता अमली पदार्थ तस्करीसाठी मेट्रोचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा चाचणीतून बाहेर पडल्यानंतर कोणालाही संशय येत नाही आणि वाहतूक कोंडीतून ही सुटका होते. मात्र घाटकोपरच्या मेट्रो सुरक्षा चाचणीत संशय आल्याने आरोपीला अटक झाली आहे. तर हा अमली पदार्थ कुठून आणला आणि तो कोठे पुरवला जाणार होता आणि या मागे कोणती टोळी कार्यरत आहे याचा तपास अंधेरी पोलीस ठाणे करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वातावरणातील बदलाचा फटका कोस्टल रोडला बसू शकतो , मुंबई महापालिका आयुक्तांचे भाकीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -