घरमुंबईमहत्त्वाची बातमी! सर्व परिक्षांसह आयडॉलच्या न होऊ शकलेल्या परीक्षा १९ ॲाक्टोबरपासून सुरू

महत्त्वाची बातमी! सर्व परिक्षांसह आयडॉलच्या न होऊ शकलेल्या परीक्षा १९ ॲाक्टोबरपासून सुरू

Subscribe

तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून सूरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. आज, बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेतांना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये, असेही संचालक डॅा विनोद पाटील यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

दूरस्थ व मुक्त अध्ययन शिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मंगळवारी तांत्रिक अडचणीचे कारण देत मुंबई विद्यापीठाने अचानक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच कंपनीचे मानधन थांबवण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला होता. मात्र आता परिक्षेची तारीख निश्चित झाली असून विद्यार्थ्यांमधील संभ्रमदेखील दूर झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

काढा प्यायल्यामुळे लिव्हरला त्रास होतो? आयुष मंत्रालयानं सांगितलं सत्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -