करोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत: परीक्षा, निकाल, प्रवेशाचा गोंधळ उडणार

Mumbai
Corona suspect people's will be treated at their home
करोना व्हायरस

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित झाल्याने राज्यातील सीईटी परीक्षा आणि विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे सीईटी परीक्षा, निकाल आणि नवीन वर्षाच्या प्रवेशाचा गोंधळ उडणार आहे. यामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष विस्कळीत होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभारत १५ एप्रिल पर्यंत लॉकडाउनची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. यामुळे सीईटी सेलने एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल ५ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा लांबणीवर गेल्याने प्रथम वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

अभियांत्रिकी, कृषी, एमबीए, विधी अशा विविध अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा लांबणीवर जाणार असल्याने याचे निकाल आणि अभ्यासक्रमाची प्रवेश सुरु होण्यास मे जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु होण्यास जुलै महिना लागू शकतो. यामुळे या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष लांबणार आहे.
राज्य सरकारने शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाठोपाठ राज्यातील सर्व विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा पंतप्रधानांनी १५ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्याने विद्यापीठाची परीक्षाही पुढे गेली आहे.

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आणखी निर्बंध येऊ शकतात यामुळे विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक तयार करत नाही. विद्यापीठाच्या परीक्षा सुमारे दोन महिने चालतात. परीक्षांनंतर निकाल जाहीर होण्यास दीड महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे यंदा विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालाचा मोठा गोंधळ उडणार असून याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. यातून आगामी शैक्षणिक वर्ष विस्कळीत होण्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here