घरमुंबईबनावट अगरबत्तीच्या गोदामावर पोलिसांचा छापा

बनावट अगरबत्तीच्या गोदामावर पोलिसांचा छापा

Subscribe

बनावट अगरबत्त्यांचा साठा असलेल्या गोदामावर पोलिसांनी छापा मारला आहे. या गोदाम मालकावर पीराईट कायदेनुसार कारवाई करण्यात आली.

डासांना पळवून लावणाऱ्या बनावट अगरबत्ती बनवणाऱ्या एका गोदामावर पोलिसांनी छापा मारला आहे. ‘धूप छाव अँड कंपनी’च्या ‘कम्फर्ट’ या अगरबत्तीचे बनावटीकरण करून विकण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अगरबत्त्यांची सर्रासपणे विक्री करणाऱ्या कारखान्यावर शिवाजी नगर पोलिसांनी छापा टाकून हजारो किमतीच्या बनावट अगरबत्तीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करून त्याच्याविरुद्ध कॉपीराईट कायदेनुसार कारवाई करण्यात आली.

कसा घडला प्रकार

गोवंडी शिवाजी नगर ठिकाणी ‘धूप छाव अँड कंपनी’ चे डासांना पळवून लावणाऱ्या कम्फर्ट या अगरबत्तीच्या नावाच्या बनावट अगरबत्तीचे गोदाम असल्याची माहिती ‘धूप छाव अँड कंपनी कंपनीचे तपासिक अधिकारी यतीन पाटील यांना मिळाली होती. पाटील यांनी खात्री करून पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले. शिवाजी नगर पोलिसानी गुरुवारी सकाळी सदर गोदमावर छापा टाकून हजारो रुपये किमतीचे कम्फर्ट नावाने हुबेहूब तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीचा साठा जप्त केला. या प्रकरणी कॉपीराईट कायदानुसार गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली. धूप छाव अँड कंपनीचे सुगंधी अगरबत्ती तसेच डांसांना पळवून लावण्याचे वेगवेगळे नावाचे प्रॉडक्ट्स आहे, या प्रोडक्टची नकल करून त्याची बाजारात विक्री करून ग्राहकांची आणि कंपनीची फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली असल्याची माहिती धूप छाव अँड कंपनीचे तपासीक अधिकारी यतीन पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -