‘मी आतापासून भाजपसोबत’, नौदल अधिकाऱ्याची घोषणा

From now on, I am with BJP-RSS says ex navy officer madan sharma
'मी आतापासून भाजपसोबत', नौदल अधिकाऱ्याची घोषणा

शुक्रवारी मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्याला काही शिवसैनिकांनी मारहाण केली होती. याच प्रकरणी आज माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीस गेले होते. दरम्यान राज्यपालांच्या भेटीनंतर मदन शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपण भाजप-आरएसएस सोबत असल्याचे जाहीर केले.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा म्हणाले की, ‘आतापासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे. जेव्हा मला मारहाण केले गेली, तेव्हा माझ्यावर मी भाजप-आरएसएस सोबत असल्याचा आरोप लावला होता. म्हणून मी आता भाजप-आरएसएस सोबत असल्याचे जाहीर करतो.’

आज दुपारी १२ वाजता मारहाण प्रकरणी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. दरम्यान आता मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यानंतर मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे मारहाण केली होती. याप्रकरणी १२ सप्टेंबरला एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. पण त्यांना जामीनावर सुटका मिळाली होती. आता पुन्हा एकदा रात्री उशिरा या सहा जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.


हेही वाचा – ‘ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करता’, जया बच्चन यांनी रवी किशन यांच्यावर केली टीका